शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

वारसदारांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: February 24, 2017 04:48 IST

सत्ता कोणतीही असो, ती कुटुंबातच राहिली पाहिजे, याकडेच अनेक नेत्यांचा कटाक्ष असतो. जिल्हा परिषद

 उस्मानाबाद : सत्ता कोणतीही असो, ती कुटुंबातच राहिली पाहिजे, याकडेच अनेक नेत्यांचा कटाक्ष असतो. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तर नेत्यांनी जणू काही आपल्या कुटुंबातील वारसदारांच्या ‘लाँचिंग’साठीच लढल्याचे दिसून आले. यात काहींना मतदारांनी नाकारले असले तरी अनेकांच्या वारसदारांना या निवडणुकीतील विजयामुळे ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. औसा मतदारसंघाचे आ. बसवराज पाटील यांनी त्यांचे पुत्र शरण पाटील यांना उमरगा तालुक्यातील आलूर गटातून मैदानात उतरविले होते. पाटील यांनी येथे १७४४ मताधिक्याने विजय मिळविला. आता उमरगा-लोहारा तालुक्यातील काँग्रेसची सूत्रे शरण पाटील यांच्याकडे अधिकृतरित्या राहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. मधुकरराव चव्हाण यांनीही त्यांचे पुत्र बाबूराव चव्हाण यांना अणदूर गटातून रिंगणात उतरविले होते. त्यांची लढत माजी आ. आलुरे गुरूजी यांचे नातू दीपक आलुरे यांच्याशी होते. येथे चव्हाण यांनी बाजी मारली. याबरोबरच गुंजोटी मतदारसंघातून भाजपा नेते तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैैलास शिंदे यांचे पुत्र दिग्विजय शिंदे विजयी झाले आहेत. भाजपाचेच ज्येष्ठ नेते शिवाजी चालुक्य यांचे पुत्र अभय पाटील तुरोरीतून तर चालुक्य यांच्या भगिनी जकेकूर विजयी झाल्या. (प्रतिनिधी) उस्मानाबादपक्षजागाभाजपा०४शिवसेना११काँग्रेस१३राष्ट्रवादी२६इतर०१