शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन गये..

By admin | Updated: July 9, 2014 02:18 IST

यंदाच्या 2014-15च्या रेल्वे अर्थसंकल्पातही तीच पुनरावृत्ती नव्या सरकारकडून करण्यात आली.

मुंबई : मागील रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि ठाणो जिल्हय़ाच्या पदरी निराशाच आलेली असताना यंदाच्या 2014-15च्या रेल्वे अर्थसंकल्पातही तीच पुनरावृत्ती नव्या सरकारकडून करण्यात आली. त्यामुळे अच्छे दिन गये अशीच काहीशी प्रतिक्रिया मुंबई आणि ठाणोकरांमध्ये उमटली. या अर्थसंकल्पात रेल्वे स्थानकांवर देण्यात येणा:या हायटेक सुविधांची घोषणा करतानाच अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांची री ओढण्यात आली आहे.  
रेल्वेच्या 2013-14च्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मुंबईतील उपनगरीय लोकलसाठी 72 फे:या, एसी लोकल, कल्याण-कर्जत तिसरा मार्ग, एलिव्हेटेड प्रकल्प पीपीपी मॉडेलवर राबवण्याची घोषणा केली. यातील 72 फे:या सोडल्या तर इतर उर्वरित घोषणा या जुन्याच होत्या. त्यामुळे 2014-15च्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई आणि ठाणो विभागातून शिवसेना-भाजपाचे 1क् खासदार निवडून देणा:या आणि लोकलने प्रवास करणा:या 75 लाख प्रवाशांना भरघोस सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांची री ओढण्यात आली. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी 864 डबे दोन वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येतील, अशी घोषणा केली. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू करण्यात येईल, असे सांगतानाच त्याचा निश्चित असा कालावधी त्यांनी सांगितला नाही. मुंबई-गोवा आणि मुंबई-अहमदाबाद असा हायस्पीड कॉरीडोर घोषणा करतानाच कसारा-इगतपुरी चौथा मार्ग आणि कर्जत-लोणावळा चौथा मार्ग अशी नवीन घोषणाही केली. मात्र प्रत्यक्षात उपनगरीय लोकल सेवेसाठी या घोषणोचा काहीच फायदा न होण्यासारखा आहे. भविष्यात हायस्पीड कॉरीडोरमुळे थोडाफार दिलासा मात्र मिळू शकतो. पश्चिम रेल्वेमार्गावर डीसी (1500 व्हॉल्ट) ते एसी (25 हजार व्हॉल्ट) परावर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. तर मध्य रेल्वेमार्गावर फक्त ठाणो ते सीएसटी काम बाकी आहे. त्याची माहिती या अर्थसंकल्पातून देण्यात आली. (प्रतिनिधी)
 
मुंबई-अहदाबाद बुलेट 
ट्रेन येण्यास आठ वर्षे? 
मुंबई-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणा:या प्रवाशांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात केली. मुंबई-अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा 60 हजार कोटी रुपयांचा मेगा प्रकल्प राबविला जाणार आहे.  सुरुवातीला मुंबई-अहमदाबाद व्हाया पुणो असणा:या या प्रकल्पातून पुणो भागाला वगळण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यामुळे मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवास अवघ्या काही तासांवर येईल. अहमदाबाद, बडोदा, सुरत, वांद्रे असा थांबा या ट्रेनला असणार आहे. मात्र पनवेल किंवा ठाणो स्थानकाजवळील कुठल्याही तरी एका स्थानकावर ट्रेनला थांबा देण्याचा प्रयत्न रेल्वेचा असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले.  
 
मुंबई-गोवा प्रवास वेगवान होणार
1मुंबई ते गोवा मेल-एक्स्प्रेसने प्रवास करणा:या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. या मार्गावर धावणा:या ट्रेनचा वेग भविष्यात ताशी 160 ते 200 किलोमीटर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे. याबाबतची घोषणाही रेल्वे अर्थसंकल्पात झाली असली तरी त्यावर रेल्वेने कामही सुरू केले आहे. मुंबई ते गोवादरम्यान मोठय़ा प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. 
2तसे पाहिल्यास कोकणवासीयांची गर्दीच्या काळात संख्या अधिक असते. त्याचप्रमाणो मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरही साधारण 25 ट्रेन रोज धावत असून, 12 ते 13 हजार प्रवासी यामधून प्रवास करतात. प्रवासी आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवत मुंबई ते गोवा तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील वेग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या मार्गावरून जाणा:या गाडय़ांचा वेग हा ताशी 130 किलोमीटर एवढा आहे. 
3मात्र आता हाच वेग 160 किलोमीटर ते 200 किलोमीटर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळांची क्षमता वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे नागपूर ते सिकंदराबाद विभागातीलही ट्रॅकची क्षमता वाढवण्यात येणार आहे. 
 
864 नव्या गाडय़ा दोन वर्षात
मुंबईतील उपनगरी सेवांसाठी येत्या दोन वर्षात आणखी 864 अत्याधुनिक लोकलगाडय़ा (ईएमयू रेक्स) उपलब्ध होतील, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. उपनगरी रेल्वेचा विद्युत पुरवठा सध्याच्या 15क्क् व्होल्ट डीसीवरून 25 केव्ही एसीमध्ये परिवर्तित करण्याचे काम पूर्ण झाल्यावर  उपनगरी रेल्वेसेवा अधिक कार्यक्षम होईल व तिचा परिचालन खर्चही कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
 
उपनगरीय गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे 
गर्दी आणि अपघातांवरील नियंत्रणासाठी उपनगरीय ट्रेनला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासाठी पायलट प्रकल्प म्हणून हे काम रेल्वेने हाती घेतले असून, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांना असे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील लोकल गाडय़ांना असणारी गर्दी पाहता हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबाबत खुद्द रेल्वे अधिका:यांमध्येच साशंकता आहे. तरीही उपनगरीय ट्रेन आणि मेन लाइन ट्रेनच्या काही गाडय़ांना सुरुवातीला पायलट प्रकल्प म्हणून स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी केली आहे.  
 
भिवंडी, कळंबोलीत शीतगोदामे
फळे व भाजीपाला यासारख्या नाशिवंत मालाच्या रेल्वे वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी हा माल साठवून ठेवण्यासाठी सेंट्रल रेलसाईड वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनच्या सहकार्याने देशभरात 1क् ठिकाणी वातावरण नियमनाची सोय असलेली ‘शीतगोदामे’ सुरू करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली. मुंबई परिसरात भिवंडी रोड व कळंबोली येथे अशी गोदामे सुरू केली जातील. 
 
दिघी, रेवस बंदरांसाठी खासगी रेल्वे
देशभरातील विविध बंदरांना वाहतुकीच्या विविध मार्गानी जोडण्याच्या ‘सागरमाला’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने रेल्वेनेही बंदरे रेल्वेने जोडण्याचा कार्यक्रम, ‘पीपीपी’ पद्धतीने निधी उभारून, हाती घेतला आहे. त्यानुसार जयगड, दिघी व रेवस या नव्या बंदरांर्पयत खासगी सहभागाने रेल्वेमार्ग टाकण्याच्या कामांना आधीच तत्त्वत: मंजुरी दिली आहे. 
 
1क् स्थानकांचा समग्र विकास
खासगी-सरकारी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून निवडक रेल्वे स्थानकांचा, नव्याने विकसित करण्यात आलेल्या विमानतळांच्या धर्तीवर, समग्र विकास करण्याची योजनाही जाहीर केली. यासाठी 1क् स्थानकांची निवड केली आहे. या स्थानकांमध्ये व त्यांच्या आसपास उपलब्ध असलेली जमीन व विकासहक्क यांचा वापर करून तेथे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या दृष्टीने विकासकामे होणार.
 
मुंबई- कोकणासाठी अधिक रेल्वेगाडय़ांची मागणी होती. पण रेल्वे अर्थसंकल्पात तसे काहीच दिसले नाही. मोदी सरकारचे हे पहिलेच रेल्वे बजेट आहे. सर्वाधिक महसूल देणा:या मुंबईकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. आम्ही सत्तापक्षात आहोत, पण मत मांडत राहू.
- खा. संजय राऊत, पक्ष प्रवक्ते, शिवसेना
 
मुंबईकरांना दिलासा मिळाला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला.
- खा. राहुल शेवाळे, शिवसेना
 
अहमदनगरसाठी हे बजेट उत्तम आहे. मनमाड-दौंड लानवी मार्ग. नगर-पुणो मार्गावर कॉर्ड, कुंभमेळा लक्षात घेऊन शनिशिंगणापूर य्ेाथे खिडकी, दौंड-परळी मार्गाच्या सव्रेक्षणाला मंजुरी मिळाल्याने आमच्या भागाचा विकास होईल.
- खा. दिलीप गांधी, भाजपा
 
कृषीविषयक सुविधा भिवंडीला निर्माण होणार आहेत. त्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळेल.
- खा. कपिल पाटील, भाजपा
 
मुंबईकरांना काहीच दिले नाही असे नाही, परंतु ठाणो-मुंबई यासह कल्याण-माळशेज कल्याण-कसारा/कर्जत तिसरी लाइन वास्तवात कधी येणार हेदेखील स्पष्ट केलेले नाही.  
- अरविंद भिडे, कल्याण रेल्वे पॅसे. असो.
 
मोदी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. त्यामुळे लगेच अपेक्षा करणो योग्य नाही, मात्र त्यातही गौडा यांनी येथील प्रवाशांच्या मूलभूत सुखसुविधांना प्राधान्य दिले आहे ही विशेष बाब म्हणावी लागेल.  
- अॅड. आदेश भगत, 
अध्यक्ष : दिवा रेल्वे प्रवासी संघ
 
 मोदी सरकार असो की आणखी काहीही. निराशाजनक नसला तरीही दिलासा देणाराही हा अर्थसंकल्प नाही हे निश्चितच 
- भालचंद्र लोहकरे, डोंबिवली पॅसेंजर असो.
 
महिलांच्या सुरक्षेसाठी 4 हजार महिला जवान तैनात करणार ही चांगली बाब आहे.  
- नाङिामा सय्यद, मुंब्रा रेल्वे प्रवासी संस्था
 
अपघातग्रस्त प्रवाशांसाठी काहीही नाही, त्यातच जखमी प्रवाशांवर तातडीने उपचार करण्यासाठी काय करणार याबाबत घोषणा नाही. 
- अॅड. दत्तात्रय गोडबोले, 
कायदे सल्लागार, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
 
864 ईएमयू म्हणजे काय हेच प्रवाशांना कळले नाही, त्याची उकल होणो अत्यावश्यक होते.  
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष : उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
 
रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतागृहे चांगली होणार आणि स्वच्छ पिण्यायोग्य पाणी प्यायला मिळणार ही दिलासा देणारी बाब आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी. 
- लता अरगडे, उपाध्यक्षा : उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
 
बजेटची प्रचंड उत्सुकता होती, त्यात बरेच काही मिळेल असे अपेक्षित होते, परंतु वास्तवाला धरून त्यांनी सर्व घोषणा केल्या ते बरेच झाले.  
- संजय मेस्त्री, बदलापूर प्रवासी
 
नवी मुंबई स्थानकाला चांगला लूक मिळणार असून, विमानतळाप्रमाणो तेथे सुविधा मिळतील ही चांगली बाब आहे. 
- अभिजित धुरत - वाशी रेल्वे प्रवासी संस्था
 
रेल्वे अर्थसंकल्प हा देशातील दळणवळण यंत्रणा अधिक भक्कम करणारा आहे. 
- अण्णासाहेब देसाई, मुंबई अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ