शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 28, 2016 02:34 IST

महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे अनेक प्रकल्प आणि योजना आखण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यानंतर पर्यटन व्यवसायातही वृद्धी झाली आहे. त्यामुळे आता पर्यटन क्षेत्राचे रूपडे पालटून महाराष्ट्राच्या पर्यटनालाही ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत आहेत.पर्यटन व्यवसायाची नवी मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आता बाह्या सरसावून पुढे आले आहे. जागतिक नकाशावरचा पर्यटन बिंदू म्हणून महाराष्ट्र लख्खपणे चमकवण्यासाठी, महामंडळाने ३ हजार कोटींचा पर्यटन विकासाचा आराखडा करण्याचे निश्चित केले आहे. २०१५ साली भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ४४ लाख ८ हजार ९१६ पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याची नोंद आहे, तर आनंदाची बाब म्हणजे, पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र द्वितीय स्थानी आहे.शासनाच्या नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण पर्यटन उद्योग संघाचीदेखील स्थापना करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)...तर मोदीच ‘अतुल्य’ भारतचा चेहरा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांमुळे पर्यटन क्षेत्रातील व्यवसायात वृद्धी झाली आहे. परदेशातील विविध देश-शहरांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणांमुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याने, भारताच्या पर्यटनाला चालना मिळाली. केंद्र सरकारचे पर्यटन खाते पंतप्रधान मोदी यांनाच पर्यटन क्षेत्राचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करण्याची शक्यता आहे.देश असो वा राज्य आपल्याकडे पर्यटन विकास समृद्ध करण्यासाठी सर्व प्रकारची संपत्ती आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन कृतिशील योजना राबविल्या पाहिजेत, तसेच पर्यटन विभागाशी निगडित इतर विभागांनी या खात्याशी समन्वय राखला पाहिजे. शिवाय, नवे तंत्रज्ञान, सोशल मीडिया अशा नव्या माध्यमांचा विकास करून पर्यटनाला हायटेक बनविले पाहिजे.- उमाकांत तासगावकर, पर्यटनतज्ज्ञ