शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांतील पहारेक-यांना ‘अच्छे दिन’ !

By admin | Updated: June 23, 2016 00:06 IST

राज्यभरातील अनुदानित आश्रमशाळांतील पहारेक-यांच्या मानधनात वाढ करण्याचा शासनाचा आदेश.

आशिष गावंडे/अकोला

      राज्यभरातील अनुदानित आश्रमशाळांतील पहारेकरी-सुरक्षा रक्षकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत होते. त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, तसा आदेश जारी केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे पहारेकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात ५५६ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. आश्रमशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये २ लाख ५६ हजार ३९८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनुदानित आश्रमशाळांसाठी अधीक्षकाचे पद मंजूर आहे; विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी स्त्री अधीक्षक तसेच पहारेकरी-सुरक्षा रक्षकाचे पद शासनाने मंजूर केले. पहारेकरी-सुरक्षा रक्षकांची पदे शासनमान्य सुरक्षा मंडळे किंवा खासगी सुरक्षा एजन्सीकडून भरण्याबाबत शासनाची मान्यता असली तरी संबंधित पहारेकर्‍यांना तुटपुंज्या (दरमहा ३ हजार २00 रुपये) मानधनावर काम करावे लागत होते. मानधनात वाढ करून देण्याची संस्थाचालकांची मागणी लक्षात घेता, मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या सुविधांचे काय?अनुदानित-विनाअनुदानित आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना अद्यापही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. वर्गखोल्यांमध्ये पंखे, लाइट, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा अभाव तर आहेच, शिवाय जेवणही निकृष्ट दर्जाचे दिले जात असल्याच्या तक्रारी अनेकदा करण्यात येतात. शहरी भागातील वसतिगृहांमध्ये यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अशा शाळांची आकस्मिक पाहणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा पुढाकार घेईल का, असा सवाल उपस्थित होतो.