शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

हुंडा विरोधासाठी गोंधळी समाजाची सोशल चळवळ

By admin | Updated: June 29, 2016 20:21 IST

सोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा

सतीश डोंगरे, नाशिकसोशल मीडिया चुुकीच्या हातात पडले तर कसा विध्वंस होऊ शकतो हे आपण वेळोवेळी बघतच आहोत. पण या माध्यमाचा सकारात्मक वापर केल्यास त्याचे सोनेही होऊ शकते याचा जणू काही आदर्शच गोंधळी समाजाने घालून दिला आहे. हुंड्यासारख्या अनिष्ट पद्धतीला विरोध करण्यासाठी समाजातील समविचारी लोकांनी एकत्र येऊन ‘व्हॉट्स अ‍ॅप आणि हाईक’वर ग्रुप तयार करून या विरोधात चळवळ उभी केली आहे. या ग्रुपमध्ये राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील समाजातील लोक सदस्य आहेत.वास्तविक गोंधळी समाजात पूर्वीपासूनच हुंडा पद्धतीला प्राधान्य दिले जाते. अलीकडच्या काळात यात काहीसा बदल झाला असून, हुंडा ‘नवऱ्या मुलाला महागड्या वस्तूच्या स्वरूपात किंवा वधूकडच्या लोकांनी दोन्ही बाजूचे लग्न धुमधडाक्यात लावून द्यावे’ या अटीवर घेतला जातो; मात्र यामुळे वधूकडील मंडळींवर येणारा आर्थिक ताण हा असह्य असतो. यासर्व बाबींचा सारासार विचार करून नाशिकमधील विजय रेणुके यांनी सोशल मीडियावर हुंडाविरोधी चळवळ उभारण्याचे ठरविले. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर ‘शुभमंगल गोंधळी’ या नावाने गु्रप तयार केला.

                                            

ग्रुपच्या माध्यमातून इच्छित वधू-वर शोधले जाऊ लागले; मात्र त्याचबरोबर हुंडाविरोधी सूरही उमटू लागला. पुढे हुंड्याला पाठबळ देणारे अन् हुंड्याला विरोध करणारे असे दोन गट समोर आले. परंतु हुंड्यामुळे होणारे दूरगामी परिणाम बघता हुंड्याला पाठबळ देणारी मंडळी काही दिवसांमध्येच हुंडाविरोधी झाली. त्यानंतर ग्रुपचे नाव ‘हुंडा विरोधी वधू-वर (गोंधळी)’ असे ठेवण्यात आले. ग्रुपमधील सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ‘हाईक’ या सोशल माध्यमावर हा ग्रुप सध्या चालविला जात आहे. ग्रुपमध्ये वधू-वरांचा सहभाग अधिक असून समाजात व्यापक जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. गु्रपमध्ये २६० सदस्य‘हुंडाविरोधी वधू-वर ग्रुप (गोंधळी)’ या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील तब्बल २६० सदस्य आहेत. यामध्ये समाजातील तरुण-तरुणी सदस्य आहेत. त्याचबरोबर २० टक्के पालकांचादेखील समावेश आहे. ही सर्व मंडळी ‘हुंडा देणार नाही अन् घेणारही नाही’ या तत्त्वाप्रमाणे ग्रुपमध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हुंडाविरोधी चळवळ चालविली जात आहे. ‘हुंडाविरोधी वधू-वर (गोंधळी)’ या ग्रुपमुळे समाजात हुंडाविरोधी गट निर्माण झाला आहे. हुंड्यामुळे होणारे दुष्परिणाम एकमेकांना शेअर केले जात असल्याने लोकांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती होत आहे. त्यातच ग्रुपमध्ये सदस्यांची संख्या वाढतच असल्याने समाजातील लोक हुंडा या पद्धतीला कडाडून विरोध करीत असल्याचे बघावयास मिळत आहे. - विजय रेणुके, ग्रुप अ‍ॅडमिन