शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या बंदरामुळे हजारो पारंपरिक मच्छीमारांवर गंडांतर

By admin | Updated: January 17, 2017 03:07 IST

जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भरावामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परिसरातील हजारो मच्छीमारांचा रोजगार बुडाला

उरण : जेएनपीटीच्या चौथ्या बंदराच्या भरावामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या परिसरातील हजारो मच्छीमारांचा रोजगार बुडाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक मच्छीमारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या (सिंगापूर) बंदराच्या अधिकाऱ्यांनाच घेराव घातला. मच्छीमारांना प्रत्येकी आठ लाखांची आर्थिक नुकसानभरपाई न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाला दिला.जेएनपीटीच्या चौथ्या (सिंगापूर) बंदराचे काम सध्या जोरात सुरू झाले आहे. सात हजार कोटी खर्चून बांधण्यात येणारे हे बंदर जेएनपीटीतील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदराच्या उभारणीनंतर जेएनपीटी कंटेनर आयात निर्यातीची क्षमता ५० लाखाने म्हणजे दुपटीने वाढणार आहे. या बंदराच्या उभारणीसाठी सध्या समुद्रात जोरदार भरावाचे काम सुरू आहे. या माती, दगडाच्या प्रचंड भरावामुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या पाणजे, डोंगरी, घारापुरी आदि गावातील हजारो मच्छीमारांवर गंडांतर आले आहे. रोजगार बुडाल्याने हजारो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.या मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौथ्या बंदर प्रशासनाच्या विरोधात मच्छीमारांनी जोरदार आंदोलन केले. मच्छीमारांना न्हावा शेवा सागरी सेतू बाधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा ३० टक्के अधिक म्हणजे प्रत्येक मच्छीमाराला आठ लाखप्रमाणे नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमारांनी सिंगापूर बंदराचे रिजनल डायरेक्टर वॅनची फुंग ची यांच्याकडे केले. संतप्त मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाविरोधात घोषणा देतानाच बंदराचे सीईओ सुरेश कुमार, जगताप, सावंत आदि अधिकाऱ्यांना घेराव घातला.न्हावा शेवा सागरी सेतूबाधित प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प सुरू होण्याआधीच मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यासाठी एमएमआरडीने सकारात्मक पावले उचलली आहेत. याकडे लक्ष वेधतानाच मच्छीमारांनी होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे बंदर अधिकाऱ्यांना सचित्र दर्शन घडविले. आर्थिक नुकसानभरपाई न दिल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मच्छीमारांनी सिंगापूर बंदर प्रशासनाला दिला. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी तसेच इतर नेते उपस्थित होते. (वार्ताहर)