शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जीव वाचवणारे सुवर्ण क्षण!

By admin | Updated: July 20, 2014 02:43 IST

आपणावर जेव्हा एखादी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती ओढवते तेव्हा आपणा सर्वानाच आपत्ती व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा वाटू लागतो आणि नेहमीप्रमाणोच हा विषय सर्वत्र चघळला जाऊ लागतो.

- महेश कांबळे
आपणावर जेव्हा एखादी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती ओढवते तेव्हा आपणा सर्वानाच आपत्ती व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा वाटू लागतो आणि नेहमीप्रमाणोच हा विषय सर्वत्र चघळला जाऊ लागतो. त्यानंतर आपत्तीचे नावनिशाण मिटले की आपला त्यातील रस निघून जातो, तो पुढील आपत्ती ओढवेर्पयत! आपले हे दुर्लक्षच आपणाला पुढील आपत्तीर्पयत घेऊन जात असते. याच कालावधीत आपण आपत्तीला तोंड देण्याच्या दृष्टीने नियोजन केले, तर होणारे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.
 
पूर येऊ नये यासाठी नालेसफाई, बांध घालणो असे काही उपाय करण्याची चर्चा आपण करीत असतो. मात्र ही एका अर्थाने तात्पुरती उपाययोजना असते. शिवाय नियोजन करतानाच पाणी वाहून जाण्याच्या आणि जमिनीत मुरण्याच्या सुविधांवर लक्ष ठेवता आले तर शहरी आणि नागरी पुराचा धोका निश्चितच टाळता येऊ शकतो. शहरातील सखोल भागात वस्ती होऊ न देणो, कांदळवनांचे संरक्षण करणो हे त्यासाठी महत्त्वाचे असते. शिवाय पुरांमुळे कमीत कमी नुकसान होईल, असे नियोजन निश्चितच करता येईल. या सर्वाची अंमलबजावणी केल्यास पुरांमुळे होणारे नुकसान नक्कीच टाळता येईल आणि हे बांगलादेशने त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आह़े जे पुरांबाबत लागू होते तेच इतर आपत्तीबाबत लागू होते. पक्की घरे आणि त्यांचे योग्य नियोजन केले तर नक्कीच भूकंपामुळे होणारी मनुष्यहानीही टाळता येईल. योग्यवेळी आलेली पूर्वसूचना आणि त्यानुसार केलेली पूर्वतयारी याचा कसा उपयोग होतो, हे देखील नुकतेच ओरिसाने दाखवून दिले आहे. मोठय़ा चक्रीवादळातही मनुष्यहानीचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यात ओरिसाचा प्रयोग उल्लेखनीय आहे.
मुळात कोणतीच सामाजिक आणि राजकीय संस्था पूर्णपणो आपत्तीस तोंड देऊ शकत नाही. हे काम केवळ शासनच परिणामकारकरीत्या करू शकते. अर्थात त्यासाठी शासनाला संस्थांच्या सहभागाची आवश्यकता असते. शासनाला त्यासाठी योग्य ते अधिकार प्राप्त व्हावेत, म्हणून भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2क्क्5 साली लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय आपत्ती निवारणासाठीच्या सर्व जबाबदा:या व अधिकार शासनाला देण्यात आल्या आहेत. शासकीय-निमशासकीय, अशासकीय अधिकारी व सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची स्थापना करण्यात आली आहे. सर्व राज्य प्रशिक्षण संस्थांतून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे. शिवाय या कायद्यानुसार नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे. सशस्त्र दलातील विशेष प्रशिक्षित अशा जवानांचे दल कोणत्याही आपत्तीमध्ये अत्यंत सक्षम प्रतिसाद देण्यासाठी गरजेच्या सर्व वस्तूंवर कायम तयार असणो अपेक्षित आहे. आपत्ती काळात लागणा:या रकमा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर आपत्ती निवारण निधीची स्थापना करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेची मुख्य जबाबदारी शासनाची असून, केंद्र शासन गरजेनुसार मदत करेल व जिल्हा प्रशासन यात कळीची भूमिका बजावेल, हे कायद्यात स्पष्ट होते.
कोणतीही आपत्ती अचानक येत नसते. तर ज्या अनियोजित पद्धतीने विकास होत असतो त्यातच ती दडलेली असते. चुकीच्या पद्धतीने झालेले नागरीकरण आणि त्यातून उभी राहिलेली बकाल शहरे, नैसर्गिक स्त्रोतांचे विषम वाटप, नैसर्गिक स्त्रोतांचा अमर्यादित वापर आणि दुरुपयोग व त्यातून वाढणारी सामाजिक विषमता, दारिद्रय़ हे सर्व आपत्तीला आमंत्रण देत असतात. समाजात जोर्पयत भेदभाव राहतील तोर्पयत समाज नेहमीच आपत्तीप्रवण राहील. आपत्तीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पर्यावरणाबाबत संवेदनशील व चिरंतन विचारांचे प्रारूप समोर ठेवून काम करणो हा एकच उपाय आपत्ती निवारणाचा कळीचा मुद्दा आहे. 
(लेखक जमशेदजी टाटा सेंटर फॉर डिझास्टर मॅनेजमेंट विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत. ) 
 
संकटं कधी सांगून येत नाहीत़ म्हणून आपण त्याच्याशी दोन हात करण्यास तयार राहायला हवे. आपत्तीबाबत जागरूक असायला हवे. 
 
आपत्ती ओढवल्यानंतर आपत्तीग्रस्तांना पुरेशी मदत होत नसल्याचे चित्र स्पष्ट असून, त्यानंतर या आपत्तीचे राजकारण केले जात असल्याचेच अनेकदा दिसते. 
 
आपत्तीग्रस्तांचे जीवन मूळ पदावर आणण्यास मदत करणो, हा आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणा:या लोकांचा मुख्य उद्देश असतो. या सा:यांचे नियोजन करण्यासंबंधी..