शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीच्या सोनेरी पानांचे डॉक्युमेंटेशन

By admin | Updated: March 6, 2016 01:17 IST

आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो

पुणे : आठवणींतील कविता, कलाकृतींचा कप्पा जिवंत ठेवणारी ‘बालभारती’...!! प्रत्येक पिढीला या नावात आपलेपणाचा ओलावा अनुभवता येतो. शालेय जीवनाशी नाळ जुळलेल्या या रेशमीबंधाचे विविध पैलू आता सोनेरी पानांमधून उलगडणार आहेत. बालभारतीच्या इतिहासापासून ते विकासाचा, वाढीचा प्रत्येक टप्पा ‘कॉफीटेबल पुस्तका’तून पुढील पिढ्यांना अनुभवता येणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या सर्व टप्प्यांचे पुस्तक, डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने दस्तऐवजीकरण होणार आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीचे यंदा हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या बालभारतीची पिढ्यान्पिढ्यांची नाळ आहे. शालेय जीवन तर बालभारतीशिवाय अपूर्णच. त्यामुळे प्रत्येकासाठीच जिव्हाळ्याची असणाऱ्या बालभारतीत पन्नाशीत पदार्पण करताना, मागील कालखंडाचा मागोवा घेण्याचे ठरवले आहे. ५० वर्षांतील बालभारतीचा इतिहास, बदल, ते नव्या तंत्रज्ञानाकडे वाटचाल हे सगळे महत्त्वाचे टप्पे आहेत; मात्र त्यांचे योग्य वेळी जतन न झाल्यास काळाच्या ओघात त्या संदर्भातील दस्तऐवजच नष्ट होऊन जाईल. त्यामुळे येथील प्रत्येक गोष्टीचे जतन करण्याची गरज ओळखून बालभारतीने दस्तऐवजीकरण करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात शुक्रवारी बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात आली आहे. दस्तऐवजीकरणामध्ये कॉफीटेबल पुस्तक, चित्रफीत व माहितीपुस्तिका हा महत्त्वाचा भाग राहणार आहे. कॉफीटेबल पुस्तकाचे स्वरूप इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत राहणार आहे. मात्र, पुस्तकात ठळक घटकांचा समावेश होणार असून, विस्तृत स्वरूपातील माहिती ही चित्रफीत स्वरूपात, तसेच माहिती पुस्तिकांची निर्मिती केली जाणार आहे. (प्रतिनिधी)