शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सोने तस्करीचे धागे मुंबईत

By admin | Updated: January 11, 2015 00:50 IST

धावत्या रेल्वेत लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या आठ किलो सोन्याचे धागे मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांशी जुळले असून, या तिघांची लोहमार्ग पोलीस चौकशी करीत आहे.

शहाला जामीन : तीन बड्या व्यावसायिकाची नावे उघडनागपूर : धावत्या रेल्वेत लोहमार्ग पोलिसांनी पकडलेल्या आठ किलो सोन्याचे धागे मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांशी जुळले असून, या तिघांची लोहमार्ग पोलीस चौकशी करीत आहे. दरम्यान, सोन्याची तस्करी करण्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या देवांग जयेंद्र शहा (३२, नालासोपारा, जि़ ठाणे) याची आज कोर्टाने वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली आहे. कोलकाताहून मुंबईकडे शस्त्रासह सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती जीआरपीचे अधीक्षक दिलीप झळके यांना मिळाली होती. त्यावरून जीआरपीचे जवान आणि गुन्हेशाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने नागपूरपासून १२१०२ अप ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील विविध डब्यांची झडती घेतली. भुसावळजवळ बोगी क्रमांक बी- १ च्या बर्थ क्रमांक ३९ वर शहा बसून होता. संशय आल्याने शहाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या अंगातील जॅकेटमध्ये पोलिसांना आठ किलो सोन्याच्या कॅटबरी आढळल्या. सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे हे सोने पोलिसांनी जप्त केले. लोकमतने आज हे वृत्त ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर संबंधित वर्तुळात खळबळ निर्माण झाली.दरम्यान,लोहमार्ग गुन्हे शाखेचे निरीक्षक वासुदेव देसले व लोहमार्गचे निरीक्षक आनंदा महाजन यांनी रात्रभर शहाला विचारपूस केली. त्याने मुंबईतील तीन बड्या व्यावसायिकांची नावे सांगितली. त्याला आज कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. दरम्यान, त्याने सांगितलेल्या माहितीची आणि व्यापाऱ्यांची पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)