शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दुबई, बँकॉकमधून सोने तस्करी सुरुच

By admin | Updated: June 23, 2017 02:03 IST

दुबई, बॅँकॉकमधून मुंबईत सोने तस्करीचे सत्र सुरुच असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणांकडून (एआययू) सुरु असलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दुबई, बॅँकॉकमधून मुंबईत सोने तस्करीचे सत्र सुरुच असल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणांकडून (एआययू) सुरु असलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. बुधवारी मुंबई विमानतळावर केलेल्या तीन विविध कारवाईदरम्यान तब्बल १ कोटी १४ लाख ५४ हजार किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एका व्यावसायिक महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. दुबईवरुन येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमान क्रमांक ९ डब्ल्यू ५३५ बुधवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास मुंबई विमातळावर उतरले. तेव्हा विमानाच्या शौचालयातील एका कोपऱ्यात दोन पॅकेट तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यामध्ये तब्बल ३४ लाख ८० हजार किंमतीचे १ हजार १६० गॅ्रम सोने आढळून आले. तपास यंत्रणेने ते ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे सोने कोठून व कसे आले? याचा शोध सुरु असतानाच याच फ्लाईटमधून व्हिलचेअर असलेल्या प्रवासी निमिशा गुधखा (३८) याच्या संशयास्पद हालचाली तपास यंत्रणेने हेरल्या. तिच्या व्हिलचेअरची तपासणी केली असता, त्यामध्ये १९ लाख ८० हजार किंमतीचे ६६० ग्रॅम सोने आढळून आले. तर तिसऱ्या कारवाईत जेट एअरवेजच्या फ्लाईट क्रमांक ९ डब्ल्यू ०६७ मधील एका प्रवाशाकडून ५९ लाख ९४ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. रविकिरण घनश्याम गोहेल (३५) असे प्रवाशाचे नाव असून तो बॅँॅकॉकमधून आला होता. त्याने त्याच्या सीटमध्ये हे सोने लपवून ठेवले होते. या तिन्हीही कारवाईमध्ये एकूण १ कोटी १४ लाख ५४ हजार किंमतीचे सोने जप्त केले आहेत.