शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा दर २६ हजारांवर

By admin | Updated: November 9, 2015 03:15 IST

धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार उद्या

चेतन ननावरे, मुंबईधनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोने प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग आला आहे. दसऱ्यात चढ्या भावामुळे ३० टक्क्यांनी घटलेला सोन्याचा बाजार उद्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर २० ते २५ टक्क्यांनी वधारण्याची शक्यता सराफा संघटनेने व्यक्त केली आहे.दसऱ्याला प्रतितोळा २७ हजारांचा टप्पा ओलांडलेले सोने ऐन दिवाळीत अपेक्षेप्रमाणे २६ हजारांवर उतरले आहे. त्यामुळे सोने खरेदीला वेग मिळालेला आहे. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले, की साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला सोन्याचा दर प्रतितोळा २७ हजार ४०० इतका होता. त्यामुळे ग्राहकांनीही खरेदीला हात आखडता घेतला. मात्र दिवाळीत अपेक्षेप्रमाणे सोने पुन्हा प्रतितोळा २६ हजार रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे तेजीचे वातावरण आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर गेल्या चार वर्षांत सोन्याचा दर कधीच २७ हजार रुपयांखाली गेला नव्हता. मात्र यंदा २६ हजार रुपयांपर्यंत उतरलेले सोने २५ हजार ५०० रुपयापर्यंत उतरण्याची शक्यता जैन यांनी व्यक्त केली आहे. जैन यांच्या म्हणण्यानुसार, साडेतीन मुहूर्तांपैकी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाईल. शिवाय त्याआधी सोन्याचा दर कमी असल्याने खरेदीतील उत्साह कायम राहील. दसऱ्याला सराफा बाजाराचा व्यवसाय ३० टक्क्यांनी घटला होता. त्यावेळी उलाढाल २२५ कोटी रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र दिवाळीत २० ते २५ टक्क्यांनी अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा सराफा बाजारात ३२५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.