नवी दिल्ली : मंदीच्या फे:यातून बाहेर पडताना सोन्याने 40 रुपयांची भाववाढ दिली आहे. दुसरीकडे साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी मात्र मंदीत गेली आहे. जागतिक बाजारातील तेजीचा फायदा सराफा बाजाराला मिळाल्याचे सूत्रंनी सांगितले.
राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 27,240 रुपये झाला. चांदीला मात्र किलोमागे 200 रुपये गमवावे लागले. या घसरणीनंतर चांदीचा भाव 40,500 रुपये किलो झाला. औद्योगिक क्षेत्रकडून असलेली चांदीची मागणी कमी झाल्यामुळे हा फटका बसला. गेल्या काही दिवसांतील मरगळीमुळे सोन्याचा भाव खाली आला होता. त्याचा लाभ उठवीत ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. त्याचप्रमाणो दागिने निर्मात्यांनीही खरेदी केली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)