शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी

By admin | Updated: March 21, 2016 00:54 IST

मागील १९ दिवस ओस पडलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत रविवारपासून पुन्हा ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.

पुणे : मागील १९ दिवस ओस पडलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत रविवारपासून पुन्हा ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने वाढीव अबकारी कराविरुद्ध पुकारलेला बेमुदत बंद मागे घेतल्याने रविवारपासून सोन्या-चांदीची सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनीही सुट्टीचा दिवस गाठून खरेदीचा मुहूर्त साधला.केंद्र सरकारने अंदाजपत्रकामध्ये सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील सराफी संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली होती. पुण्यासह राज्यातही सराफ सुवर्णकार फेडरेशनने या बंदमध्ये उडी घेतली होती. त्यामुळे १ मार्चपासून सर्व सराफी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड व लगतच्या भागातील दुकानांतून दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची सोन्या-चांदीची उलाढाल थंडावली होती. मागील १९ दिवसांचा विचार केल्यास सुमारे १९०० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. तसेच ग्राहकांनाही या दिवसांत सोने-चांदी खरेदी करता आली नाही. त्यामुळे विविध कार्यक्रम, लग्न खरेदीवर त्याचा परिणाम दिसून आला.अखेर शनिवारी केंद्र शासनाने सराफांच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या निर्णयानंतर सराफ संघटनांनी बंद मागे घेतल्याची घोषणा शनिवारी रात्री उशिरा केली. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच सराफी दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. मात्र, बंद मागे घेतल्याची घोषणा रात्री उशिरा झाल्याने रविवारी अनेक ग्राहक यापासून अनभिज्ञ होते. त्यामुळे दुकानांमध्ये सकाळी फारशी गर्दी दिसून आली नाही. सोन्याला २८ हजार ९०० रुपये भाव मिळाला.