शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रूळावर लघुशंकेला जाणे जिवावर बेतले

By admin | Updated: April 23, 2016 18:54 IST

मध्य रेल्वेमार्गावरील शेगांव स्थानकावर रेल्वे रूळावर लघुशंकेसाठी गेले असता रेल्वेच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर आहेत

शेगांव, दि. २३ - लग्नात आलेल्या व-हाडीपैकी नवरदेवाची मित्रमंडळी लग्न मंडपाजवळील रेल्वे रूळावर लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी नवरदेवाच्या वरातीमधील डीजे सुरू होता. या आवाजामुळे मध्य रेल्वेमार्गावरील शेगांव स्थानकावर नागपूरकडून  मुंबईकडे जाणा-या रेल्वेचा आवाज या तिघांना आला नाही त्यामुळे रेल्वेच्या धडकेत यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर आहेत. 
खामगांव तालुक्यातील अंत्रज येथील गोंडूजी सोळंके यांच्या मुलाचे लग्न शेगांव येथील ताडपू-यात राहणारे प्रकाश रामकृष्ण राठोड यांच्या मुलीशी शनिवारी दुपारी ११ च्या सुमारास झाले. या लग्न सोहळ्याकरीता नवरदेवाचे मित्र शेलोडी येथील बाबुलाल गोलनदास सोळंके वय ४० सहदेव तुळशीराम वाघ रा.अंत्रज व एक मित्र असे तिघे आले होते.
 
लग्न मंडपाजवळच रेल्वे लाईनवर हे तिघेजण लघुशंकेसाठी गेले असता लग्न सोहळ्यातील डिजेमुळे या तिघांना भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेगाडीचा आवाज ऐकु  आला नाही. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत बाबुलाल सोळंके हे जागीच गतप्राण झाले तर सहदेव तुळशीराम वाघ यांचे कमरेचे हाड मोडले व त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांना सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असुन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. तर तिस-या मित्राला जास्त मार लागल्याने त्यास अकोला येथे परस्पर भरतीसाठी नेण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक आहे.