शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गौडांची स्लो ट्रेन!

By admin | Updated: July 9, 2014 02:43 IST

आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली.

विनायक पात्रुडकर - मुंबई
आधीच भाडेवाढीमुळे पिचलेल्या मुंबईकरांना रेल्वे अर्थसंकल्पातून फारशी अपेक्षा नव्हतीच आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी ती सार्थ ठरविली. केवळ दीड महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या सरकारच्या योजनांचीच री ओढण्याची किमया केली आहे. मात्र श्रेय आपल्याला मिळेल याची पुरेशी व्यवस्थाही केली आहे. मुंबईकरांच्या तीव्र विरोधानंतर 200 टक्के वाढविलेला लोकलचा दर 14 टक्क्यांवर विसावला. या काळात मुंबईकरांनी चार-पाच तास रांगेत उभे राहून वर्षभराचे पास काढले. या दरवाढीची तीव्र प्रतिक्रिया उमटून त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो याची जाणीव झाल्याने दरवाढ मागे घ्यावी लागली. गौडा यांच्या भाषणातही मुंबई आणि महाराष्ट्राकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे जाणवले. तब्बल 70 लाख प्रवासी असणा:या आणि रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणा:या मुंबई महानगराच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे. 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा गेल्या वेळीच झाली होती. 6क् हजार कोटींचा हा प्रकल्प पूर्वीच्या नियोजनानुसार पुणोमार्गे अहमदाबाद असा होता. परंतु घाटमाथ्याच्या अडचणीमुळे पुणो वगळण्यात आले. प्रचंड खर्चाचा हा प्रकल्प किती प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे? त्याची किती वर्षात वसुली होईल? त्या मार्गावरचा प्रवाशांचा ताण किती? याही बाबींचा विचार व्हायला हवा. 
मुंबईसाठी 864 रेक्स पुढच्या दोन वर्षात उपलब्ध होतील, असेही गौडांनी घोषित केले. परंतु गेल्या वेळीही 72 लोकलची घोषणा होतीच. त्याही 12 डब्यांच्या होत्या, म्हणजे हे 864 रेक्स त्याचेच आहेत. कसारा-इगतपुरी व कजर्त-लोणावळा या मार्गावर चौथ्या लाइनसाठी पाहणी सुरू आहे. याचा प्रत्यक्ष फायदा चाकरमानी मुंबईकरांना नाही. मुंबईत दररोज सरासरी 9 जणांचा रेल्वे प्रवासादरम्यान मृत्यू होतो. अपघातानंतर त्यांना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करणारी धाडसी योजना रेल्वे बोर्डाने हायकोर्टात मांडली आहे. त्याचा उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही. 
रेल्वे सेवा ही सर्वसामान्यांसाठी सुलभ प्रवासाचे माध्यम आहे. त्याचे सेवा देण्याच्या नावाखाली व्यापारीकरण होऊ नये आणि भारतीयांची जीव की प्राण असलेली रेल्वेही परवडेनाशी होऊ नये ही अपेक्षा ठेवणा:या मुंबईकरांची भावना गैर नाही, हेही तितकेच खरे. 
 
 
 
महिला सुरक्षा
रेल्वेतील महिलांची सुरक्षा हा ऐरणीचा विषय आहे. त्यासाठी चार हजार महिला पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणाही गौडा यांनी केली. मनुष्यबळ वाढवून हा प्रश्न सुटणार नाही. सध्याच्या सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या तर इतकी नवी भरती करण्याची वेळ येणार नाही. यापेक्षा सुरक्षा यंत्रणा अधिक प्रभावशाली करण्यावर भर हवा होता.