शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

देवाचा डोंगर शासन दरबारी उपेक्षितच--डोंगर देवाचा की समस्यांचा - भाग ३

By admin | Updated: January 29, 2015 23:42 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम : दुर्दैवाचे दशावतार पाचवीला पुजलेले--लोकमतचे मानले आभार

शिवाजी गोरे - दापोली -- देवाच्या डोंगरावर सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने निसर्गाचे पाणी क्षणार्धात समुद्राकडे वाहून जाते व हिवाळा संपला की देवाच्या डोंगरावरील भटक्या धनगर समाजाची पाण्यासाठी भटकंती सुरु होते. ‘तीच माणसे, त्याच समस्या, दरवर्षी पाण्यासाठी मरणयातना’, असे दुर्दैवी जगणे त्यांच्या नशिबी आले आहे. दोन जिल्ह्याच्या सीमावादात अडकलेल्या देवाचा डोंगरावरील पाणी समस्या सोडवण्यासाठी चार वाड्यांचे मनोमीलन झाले. नळपाणी योजना राबवण्याचा ठराव झाला. मात्र, चार वर्ष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे कागदावर अडले आहे.देवाच्या डोंगरावरील पाणी समस्या ल्ह्यिातील सर्वात मोठी ीभषण पाणी समस्या असूनसुद्धा त्याकडे गांभीर्याने घेतले जात नाही. देवाच्या डोंगराकडे वारंवार शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने सरकार आपल्यावर अन्यायचच करतेय अशी भावना देवाच्या डोंगरवासीयांची झाली आहे.देवाच्या डोंगरावरील भटका धनगर समाज शिवाजी महाराजांच्या काळात उदरनिर्वाहासाठी भटकंती करत कोकणात आला. कोकणात भटकंती करताना एखाद्या सुरक्षित ठिकाणी वस्ती करुन राहू लागला. देवाच्या डोंगरावरील हा समाजसुद्धा भटकंती करत गाई मेंढ्या घेऊन देवाच्या डोंगरावर विसावला. आज या समाजाच्या कित्येक पिढ्या कोकणात होऊन गेल्या, तरीदेखील आजही त्यांच्या नशिबी उपेक्षित जगणे आले आहे. डोंगरावर स्वयंभू शंकराचे मंदिर आहे. या डोंगरावरुन देवाचा डोंगर हे नाव प्रचलित झाले. देवाच्या डोंगरावर राहणाऱ्या धनगर समाजाची ही अकरावी पिढी आहे.शासन दरबारी देवाच्या डोंगराची ओळख झाल्यावर अलीकडे काही सुधारणा झाल्या आहेत. देवाच्या डोंगरावरील चार वाड्यांकरिता खेड पंचायत समिती अंतर्गत जिल्हापरिषद मराठी शाळा सुरु करण्यात आली आहे. तुळशीवाडी, खेड तालुका, देवाचा डोंगर ही शाळा आता आठवीपर्यंत झाली आहे. परंतु, आठवीनंतर पायपीट करुन जामगेला जावे लागते. दररोज १४ किलोमीटरची पायपीट नशिबी येते. त्यामुळे काही मुलगे-मुली देवाच्या डोंगरावरील शिक्षण संपले की शाळा सोडतात. संपूर्ण साक्षरता मोहीम सरकारने राबवली; मात्र अजूनही देवाच्या डोंगरावरील भटका समाज आजही निरक्षर आहे. त्यामुळे, साक्षरता मोहीम किती फसवी आहे, हेच यावरून लक्षात येते. देवाच्या डोंगरावर एखादा माणूस आजारी पडला किंवा आजाराची साथ पसरली तर दवाखाना नाही, डॉक्टर नाहीत, देवाच्या डोंगरावर आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरकत सुद्धा नाहीत. त्यामुळे, आजारी पडलेल्या माणसाला दापोली, खेड किंवा महाडशिवाय पर्याय नाही. रात्री-अपरात्री कोणती दुर्घटना घडल्यास कोणतेही वाहन नाही. देवाच्या डोंगरावर लाईट आहे. परंतु, होल्टेज नसते. वीजेचे दिवे होल्टेजअभावी लुकलुकत मंद प्रकाश देतात. बऱ्याचदा, आठ आठ दिवस वीज नसते. महावितरणचे कर्मचारी इकडे फिरकतसुद्धा नाहीत. देवाच्या डोंगरावरील दुरावस्थेमुळे येथे येण्यासाठी पर्यटकांना फारच हाल सहन करावे लागत आहेत.लोकमतचे मानले आभार‘लोकमत’च्या रेट्यामुुळे शासनाला जाग येत आहे. गेली अनेक वर्षे पाणीटंचाईवर वृत्तांकन करुन ‘लोकमत’ने देवाच्या डोेंगरवासीयांना सहकार्य केले. या वृत्ताची दखल घेऊन अनेक लोक देवाच्या डोंगरावर येऊन गेले. नळपाणी योजनेचे आश्वासन देण्यात आले. गेली ८ वर्ष आमच्या व्यथा लोकमतमधून मांडत जात आहेत, असे सांगून त्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.रोटी बेटी व्यवहार रखडलेदेवाच्या डोंगरावरील धनगर समाजाचे कुलदैवत सातारा जिल्ह्यात आहे. जत्रेला जाण्याची प्रथा कायम आहे. जुन्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न करण्याची प्रथा धनगर समाजाची आहे. पाणीटंचाईमुळे धनगर समाज रोटी बेटी व्यवहार करण्यास नाखुश असल्याने सातारा-सोलापूर-सांगली-नगर जिल्ह्यात त्यांना रोटी बेटी व्यवहार करावा लागतो.योजनेचे घोडे अडलेलेदेवाच्या डोंगरावरील चारही वाड्यांसाठी भोळवली धरणातून पाणी योजना राबवण्याचा निर्णय झाला. दापोली-मंडणगड पंचायत समिती ४ वर्षांपूर्वी संयुक्त पाहणी केली होती. भोळवली धरणातून पाणी उचलून नळपाणी योजना राबवण्याचे ठरले. चार वर्ष होऊन गेली, तरीही नळपाणी योजनेचे घोडे अजून कागदावरच असल्याचे दिसून येते.पायाभूत सुविधांचा अभावदेवाच्या डोंगरावर मावी वस्ती आहे. मात्र, या वस्तीत सरकारकडून पायाभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. येथे आजही पायाभूत सुविधांचा अभाव जाणवतो. पाणी, रस्ते, शिक्षण, शौचालय यांचा अभाव आहे. देवाचा डोंगर येथे राजकीय पुढाऱ्यांचा रहिवास केवळ निवडणुकीपुरताच असतो.नळपाणी योजनेचे घोड अडले कागदावरच.डोक्यावरचा हंडा कधी उतरणार ? देवाचा डोंगरवासीयांचा सवाल.शिवरायांच्या काळात भटका धनगर समाज सातारा जिल्ह्यातून भटकंती करत करत येऊन विसावला देवाच्या डोंगरावर.१९७२ नंतर देवाच्या डोंगरावरील झरे अचानक आटले; तेव्हापासून सुरु झाला वनवास.पूर्वीच्याकाळी देवाच्या डोंगरावरून आजारी माणसाला डोलीत बसवून न्यावे लागत होते दवाखान्यात.पाऊलवाट अन हलाखीची परिस्थिती; त्यामुळे आजारी माणसला डोली हाच पर्याय.देवाच्या डोंगरावरील सर्वाधिक वाद केवळ पाण्यामुळेच.महसुली सीमावादात अडकलाय देवाचा डोंगर.डोंगर देवाचा; वाद सीमेचा.देवाच्या डोंगराला एसटीची प्रतिक्षा.देवाच्या डोंगराला पर्यटनाचा क दर्जा, मात्र पर्यटन सुविधांची वानवा.देवाच्या डोंगरावरून दिसते विलोभनीय दृश्य, मात्र सुविधांच्या अभावामुळे देवाचा डोंगर दुर्लक्षितच.देवाच्या डोंगरावरील भटक्या समाजाला नवीन सरकारकडून फार अपेक्षा आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी ‘अच्छे दिन’ आयेंगे सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘अच्छे दिन’ कधी येतात, त्याची प्रतिक्षा आहे. आमच्यासाठी लवकर ‘अच्छे दिन’ यावेत व पाणी समस्या कायमची संपावी.- पांडुरंग आखाडे, ग्रामस्थदेवाच्या डोंगरावर नळपाणी योजना होईल, असे सांगण्यात आले होते. गेले २० ते २५ वर्षे नळपाणी योजनेत आश्वासने दिली जातात. नळपाणी योजना कधी होणार. आमच्या डोक्यावरचा हंडा उतरणार कधी ? निदान आमच्या नशिबात जे आहे ते मुलांच्या नशिबी येऊ नये.- मंदा आखाडे, ग्रामस्थ