कोपरगाव (अहमदनगर) : गोदावरी नदीच्या येथील दक्षिण तिरावर सोमवारी झालेल्या पुष्कर स्नानाच्या पर्वणीवरही दुष्काळाची छाया होती. ऐन पावसाळ्यातच गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने हजारो भाविकांवर केवळ ‘स्प्रिंकलर’ने पाणी शिंपडण्यात आले. भाविकांनीही त्यातच स्नान केल्याचे समाधान मानले. कोपरगाव बेट देवस्थान (गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर) व सद्गुरू शिवानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर १२ वर्षांनी येथे पुष्करस्नानाचा सोहळा होतो. सकाळी सद्गुरू शुक्राचार्यांच्या मंदिरापासून शुक्राचार्य महाराज, श्री कचेश्वर महाराज यांची पालखी निघाली़ तीरावर प्रथम गंगापूजन व देवतास्नान झाले़ आमदार स्नेहलता कोल्हे व बिपीन कोल्हे यांनी धर्मध्वज स्थापना व पूजन केले. (प्रतिनिधी)
गोदाकाठी ‘स्प्रिंकलर’ने पुष्कर स्नान!
By admin | Updated: September 8, 2015 01:34 IST