शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटचा देव उतरला विकासाच्या मैदानात; गोयकरवाडीसाठी 5 लाखाचा निधी

By admin | Updated: April 12, 2017 17:32 IST

तो करोडो किक्रेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. तो जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्याची बॅट तळपायची. तो खेळायचा तेव्हा धावांचा पाऊस पडायचा.

अरविंद हजारे / आॅनलाईन लोकमत जवळा (अहमदनगर), दि. 12 - तो करोडो किक्रेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. तो जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्याची बॅट तळपायची. तो खेळायचा तेव्हा धावांचा पाऊस पडायचा. म्हणूनच ‘त्याला’ क्रिकेटचा देव म्हणतात. तो जितका शांत तितकाच संवेदनशीलही. होय आपण बोलतोय ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विषयी. क्रिकेटचा हा देव आता खेडी विकासाच्या मैदानात उतरलाय़ त्याने जामखेड तालुक्यातील दोन गावांतील विकासकामांसाठी त्याच्या खासदार निधीतून ५ लाख ४१ हजार ७७५ रुपयांचा निधी दिला आहे.सचिन तेंडूलकर राज्यसभेत खासदार आहे़ खासदार निधीतून जवळा व गोयकरवाडी गावातील विकासासाठी निधी मिळावा, अशी संतराम सूळ, डॉ़ दीपक वाळूंजकर आदींनी २०१६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सचिन तेंडूलकर यांच्याकडे पत्रान्वये केली होती़ या पत्राची दखल घेत सचिन तेंडुलकर यांनी जवळा व गोयकरवाडी गावासाठी निधी देण्याची मान्य केले़ सोमवारी (दि़१०) निधी मान्य झाल्याचे पत्र प्रशासनाला मिळाले आहे़ या पत्रानुसार सचिन तेंडुलकरने यांनी आपल्या खासदार निधीतून जामखेड तालुक्यातील जवळा येथील गोयकरवाडी गावाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी १ लाख ९९ हजार ६२१ व जवळा येथील जिल्हा परिषद शाळेला शौचालय बांधण्यासाठी ३ लाख ४२ हजार १५४ रुपये असे एकूण ५ लाख ४१ हजार ७७५ रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. खासदार सचिन तेंडुलकर यांना सामान्य नागरिकांनी पत्र पाठवले़ कोणाचीही मध्यस्थी नाही की कोणाची शिफारस नाही. केवळ सामान्य नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने पाठविलेल्या पत्राची दखल घेत खासदाराने निधी दिल्याचा दुर्मिळ योग भारतीय राजकारणात सचिन तेंडूलकर यांनी जुळवून आणला आहे.क्रिकेटचा देव असलेल्या तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून गावातील विकासकामासाठी केलेली मदत ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श असून देशातील अन्य खासदार सचिन तेंडूलकर यांची प्रेरणा घेणार का? हा प्रश्नच आहे.