शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या गोवा प्रांत बरखास्तीची घोषणा उद्या

By admin | Updated: March 5, 2017 21:24 IST

गोव्याचे संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोवा प्रांत संघाच्या बरखास्तीची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 5 : गोव्याचे संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोवा प्रांत संघाच्या बरखास्तीची घोषणा सोमवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे. सोमवारपासून गोव्यातील स्वयंसेवक हे कोंकण प्रांताशी पुन्हा संलग्न राहणार आहेत.प्रांताच्या बरखास्तीचा निर्णय हा एकमताने घेण्यात आला असून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वेलिंगकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. नवीन प्रांताची निर्मितीही विशेष कारणासाठी आणि तात्पुरती व्यवस्था म्हणून करण्यात आली होती. तो बरखास्त करण्याचा निर्णयही तो निर्माण करतानाच ठरला होता, आता त्याची अंमलबजावणी होत आहे असे वेलिंगकर यांनी सांगितले. बरखास्तीचा निर्णय हा अगोदर ठरलेला जरी असला तरी त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचे एकमत व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. चार विशेष बैठका घेण्यात आल्या होत्या. चौथी रविवारी झालेली बैठक ही दोन ठिकाणी झाली. उत्तर गोव्यासाठी पर्वरी येथे आणि दक्षीण गोव्याची मडगाव येथे. बैठकीत काही वेगळेही सूर निघाले होते, परंतु बरखास्तीच्या बाबतीत मात्र एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तात्पुरती व्यवस्था म्हणून स्थापन करण्यात आलेला गोवा प्रांत माध्यम मुद्यावर जरी शिक्कामोर्तब झाले असले तर राजकीय आघाडी म्हणून स्थापन करण्यात आलेला गोवा सुरक्षा मंच मात्र तसाच ठेवला जाणार आहे. पक्षाचे भवितव्य पक्षाची कार्यकारणी ठरविणार आहे. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून संघ आणि भाजपात बिनसल्यामुळे गोव्यात संघाने थेट भाजपाच्या विरोधात लढाईच पुकारली होती. त्यामुळे वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी करण्यात आले होते. त्यानंतर सर्व संघ पदाधिकाऱ्यांनी पदे सोडली होती आणि आणि कोंकण प्रांताशी संलग्नता तोडून वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा प्रांताची स्थापना करण्यात आली होती.