शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

‘आरएसएस’चं लक्ष्य.. नवीन शंभर शाखा !

By admin | Updated: October 27, 2014 23:46 IST

काळाचा महिमा : केंद्रातील सत्ताबदलानंतर जिल्ह्यात वीस शाखांची वाढ

सातारा : केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. याला सातारा जिल्हादेखील अपवाद ठरलेला नसून जिल्ह्यात गेल्या शंभर दिवसांत जवळपास वीस शाखांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, संघ आणि संघाच्या विविध उपक्रमांत तरुणाईचा ओढा वाढत असल्यामुळे ‘आरएसएस’ने वर्षभरात जिल्ह्यात शंभर नवीन शाखा सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.सातारा जिल्ह्यात १९३0 च्या दशकापासून ‘आरएसएस’चे काम सुरू आहे. सातारा येथील समर्थ शाखा आणि कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथील शाखा सर्वात जुन्या मानल्या जातात. नाना पालकर, मुकुंदराव दाबके यांनी जिल्ह्यात ‘आरएसएस’ वाढीसाठी प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना काही प्रमाणात यशही आले.आजमितीस मात्र सातारा जिल्ह्यातील ३0 गावांमध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ तथा ‘आरएसएस’च्या ५४ शाखा आहेत. यापैकी फक्त सोळा शाखा या सातारा तालुक्यात आहेत. कऱ्हाड, वाई आणि फलटण तालुक्यांत ‘आरएसएस’ वाढत आहेत. माण तालुक्यातील आठ गावांमध्येही शाखा सुरू आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जिल्ह्यात वीस शाखांची वाढ तर झालीच त्याचबरोबर शंभर नवीन गावांमध्ये संपर्क यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी सातारा शहरात ढगफुटी झाली होती. या काळात अनेक घरांमध्ये चुली पेटल्याच नाहीत. शहरातील ‘आरएसएस’च्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने लोकांना जेवण पोहोच केले होते. अजिंक्यतारा किल्ला साफसफाई मोहिमेतही सहभाग असतो. दरवर्षी सूर्यनमस्कार स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी होतात. ‘आरएसएस’च्या अखत्यारित ‘सामाजिक समरसता मंच’तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते.महाबळेश्वर, माण, खटाव आणि पाटण तालुक्यांत ‘आरोग्य रक्षक’ योजना राबविण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘विश्वमंगल गो-ग्राम योजना’ राबविण्यात येत आहे. डॉ. सुभाष दर्भे जिल्हा संघचालक तर जयवंत सामंत जिल्हा कार्यवाह आणि महेश शिवदे तालुका कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)कोणत्या घटकांसाठी नेमके काय हवे, त्यांचे प्रश्न काय आहेत. यावरही आम्ही विचार करतो आणि त्या दृष्टीने स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत असतो. परिणामी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येते.- विठ्ठल बलशेटवार, जिल्हा कार्यवाहराष्ट्रीय स्वयंसेवक संघात जिल्ह्यातील तरुणाईचा ओढा वाढत आहे. काही ठिकाणांहून स्वत:हून तरुण संपर्क साधत असून, त्यांनीही शाखा सुरू करण्याची विनंती केली आहे.- मुकुंद आफळे, जिल्हा सहकार्यवाहसातारा शहरात ११ जानेवारीला मोठे संचलनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातारा शहरात ११ जानेवारी २०१५ रोजी मोठे संचलन होणार आहेएक हजार तरुण स्वयंसेवक गणवेशासह सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी आतापासून संघाच्या १४८ मंडलांतून संपर्क मोहीम सुरू झाली आहे.