शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : सुझान खानविरोधातील 'तो' गुन्हा रद्द

By admin | Updated: August 25, 2016 13:28 IST

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्याविरुध्द गोवा पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द ठरवला आहे.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. २५ -  बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्याविरुध्द शहर पोलिसांनी १ कोटी ८७ लाख रुपये फसवणूक प्रकरणात नोंदविलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे.

या निवाड्यानंतर सुझान हिने याची माहिती व्टीटरवर देताना न्यायमंडळाचे आभार मानले आहेत.आपल्याविरुध्दचे गुन्हे कोर्टाने रद्दबातल ठरविले त्यामुळे आपण आरोपमुक्त झाले आहे, असे तिने म्हटले आहे. 
भादंसंच्या कलम ४२0 खाली पोलिसांनी तिच्याविरुध्द हा गुन्हा नोंदविला होता. डिझायनर असलेल्या ३७ वर्षीय सुझान हिने त्यास हायकोर्टात आव्हान दिले होते. 
स्वत: आर्किटेक्ट असल्याचे भासवून २0१३ साली तिने एका प्रकल्पासाठी ‘आर्किटेक्चरल अ‍ॅण्ड डिझायनिंग सर्व्हिसेस’चे कंत्राट मिळविले आणि फसवणूक केल्याचा आरोप तिच्याविरुध्द होता. एमजी प्रॉपर्टीज या रीयल इस्टेट आस्थापनाचे व्यवस्थापकीय भागिदार मोहित गुप्ता यांनी यासंबंधी पोलिस स्थानकात तक्रार केली होती. तिने वेळेत काम पूर्ण केले आणि आणि जे काम केले ते निकृष्ट दर्जाचे होते, असेही तक्रारीत म्हटले होते. आर्किटेक्चर मंडळाकडेही सुझान हिची नोंदणी नसल्याचे आढळून आले.
सुझान हीच्या मालकीच्या काही कंपन्या आहेत. अंतर्गत सजावट तसेच डिझाइन कौशल्य याच्याशी या कंपन्या निगडित आहेत. 
या प्रकरणी आधी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ चालवली होती परंतु तक्रारदार एमजी प्रॉपर्टीजने न्यायालयात धांव घेतल्यानंतर तिच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.