शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुराचा मुलगा अभ्यासासाठी जपानला जाणार

By admin | Updated: May 11, 2017 00:18 IST

सचिंद्र जाधवची दौऱ्यासाठी निवड : इन्स्पायर अवॉर्डमध्ये शेतीमित्र विज्ञान उपकरणाचा विजेता

लोकमत न्यूज नेटवर्क --भोगावती : कौलव (ता. राधानगरी) येथील बाळासाहेब पाटील-कौलवकर हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थी सचिंद्र जाधव याची जपान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेला यावर्षीचा सचिंद्र जाधव हा एकमेव विद्यार्थी आहे. इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सचिंद्र जाधव याने राष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक मिळविल्याने त्याला हा बहुमान मिळाला आहे. त्यानिमित्त आर्य समाज शिक्षण संस्थेमार्फत तनयाचा सत्कार आणि रोख पारितोषिक देण्यात आले. राज्यातून जपान दौऱ्यासाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून, सचिंद्र जाधव हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे. यावर्षीच्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात दहावीतील सचिंद्र जाधव याने शाळेतील विज्ञान शिक्षक आनंदराव चरापले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमित्र हे विज्ञान उपकरण तयार केले होते. या उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन, पुसा नवी दिल्ली येथे झाली होती. तेथे त्याला तिसरा क्रमांक मिळाला. केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, संशोधक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कांस्यपदक, प्रशस्तिपत्र आणि लॅपटॉप असे पारितोषिक त्याला मिळाले. आता त्याची जपान अभ्यास सहलीसाठी निवड झाली.सचिंद्र जाधव हा पिंपळवाडी गावातील भोगावती साखर कारखान्याकडे असलेल्या ऊस तोडणी मजुराचा मुलगा आहे. त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्याने मिळविलेले विज्ञानातील यश हे उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल सचिंद्र जाधव आणि बाळासाहेब पाटील-कौलवकर हायस्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जपान अभ्यास दौरा सत्तावीस मे ते सहा जूनपर्यंत असून, जपान देशातील विज्ञानातील महत्त्वाच्या संस्थांना भेटी देणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जपान दौरा होत आहे. यानिमित्त सचिंद्र जाधव याचा कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्या हस्ते सत्कार आणि रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. वाय. पाटील आणि शिक्षक उपस्थित होते.दहा वर्षांत जिल्ह्यातीलतिघांची निवड महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवर गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये नितीन पाटील (आरळे), यश आंबोळे (कोल्हापूर), सचिंद्र जाधव (कौलव) यांचा समावेश आहे.पिंपळवाडीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्याचे विज्ञान प्रदर्शनातील यश कौतुकास्पद आहे. बाळासाहेब पाटील हायस्कूलचा विद्यार्थी सचिंद्र जाधव याची जपानला अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना अध्यक्ष दिलीप पाटील-कौलवकर, सदाशिव पाटील, आनंदराव चरापले उपस्थित होते.