शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’

By admin | Updated: January 8, 2015 01:25 IST

देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे.

‘आयआयएम-अहमदाबाद’कडे पालकत्व : २०१५-१६ पासून सुरू होणार अभ्यासक्रमनागपूर : देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ही माहिती दिली. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देण्यात येणार आहे. २०१५-१६ या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.‘लोकमत’ने यासंदर्भात सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता, हे विशेष. दिल्लीमधील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी (क्रेडिट) व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी तावडे यांच्याशी चर्चा केली. नागपूरमध्ये ‘आयआयएम’ येणार असून, देशातील सर्वोत्तम ‘आयआयएम-अहमदाबाद’ हे नागपुरातील ‘आयआयएम’चे पालकत्व स्वीकारणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्येच यासाठी खरी चुरस होती. यासंदर्भात विधिमंडळात दोन्ही विभागांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ‘आयआयएम’ स्थापन करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्वात अगोदर तर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या चमूतर्फे लवकरच उपलब्ध जागेची तसेच तात्पुरत्या जागेची पाहणी करण्यात येईल.‘व्हीएनआयटी’त होणार शुभारंभ?नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी ‘व्हीएनआयटी’नेदेखील चार एकर जागा व दोन इमारती देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१५-१६ पासून ‘आयआयएम’चे वर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.