शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

आज होणार महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्डने स्टाईलिश पर्सनालिटीजचा गौरव

By admin | Updated: January 31, 2017 14:21 IST

कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अ‍ॅवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड

मुंबई : कॉटन किंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अ‍ॅवॉर्डचे आयोजन लोकमतच्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे स्टाईल आणि स्टाईलिश व्यक्तीमत्त्व याला नव परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा लवकरच रंगणार आहे. आजवर आपण पाहिलेल्या पुरस्कार सोहळ्यांना छेद देणाऱ्या या सोहळ्यात बॉलीवुड, मराठी चित्रपटसृष्टी, टीव्ही सृष्टी, उद्योग जगत आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळींची उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. या सोहळ्यात अभिनेता आणि सुपरस्टार हृतिक रोशनची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नेहमीच हृतिकचा लूक तरुणाई आणि रसिकांवर जादू करतो. त्यामुळे या सोहळ्यात हृतिक डॅशिंग लूकमध्ये रेड कारेपटवर अवतरणार आहे. नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा या सोहळ्याला चारचाँद लावणार आहे. स्टाइल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते. त्यामुळे या स्टाइलिश अवॉर्डमध्ये सोनमचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळणार आहे. सोकुल अशी मराठी चित्रपटसृष्टीत ओळख असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकणीर्ने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलीय. सोनालीच्या अभिनयासोबतच तिची स्टाईलसुद्धा तितकीच कुल असते. त्यामुळे मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्यात सोनालीचाही आकर्षक लूक पाहायला मिळणार आहे. तरुणाईचा फेव्हरेट आणि डॅशिंग अभिनेता अशी टायगर श्रॉफची ओळख. आपली अनोख्या स्टाइलनं आणि डान्सिंग स्टाइल यामुळे टायगर यंग जनरेशनच्या गळ्यातला ताईत बनला आहे. टायगरप्रमाणे स्टाईल असावी, त्याला फॉलो करावं अशी तरुणाईची इच्छा असते. दैनिक लोकमत आयोजित मोस्ट स्टाईलिश अवॉर्ड सोहळ्याला टायगर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे त्याच्या स्टाइलकडे तरुणाईच्या नजरा असतील. मराठी आणि बॉलीवुडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता तसंच दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर. त्यांची स्टाइल आणि फॅशन कुणाच्याही नजरा आकर्षित करते. विविध सोहळे, पार्ट्यांमध्ये महेश मांजरेकर यांची स्टाईलही लक्ष वेधून घेणार हे मात्र नक्की.रूपेरी पड्दयावर विविधारंगी भूमिका साकारुन अभिनेत्री राधिका आप्टेने रसिकांची मनं जिंकलीत. राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाईलही खास असते. या पुरस्कार या सोहळ्यात राधिकाचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हजेरी लावणार आहे. याशिवाय या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्यात अजिंक्य रहाणेची उपस्थितही आकर्षण ठरणार आहे. याशिवाय अभिनेत्री अमृता खानविलकर, प्रियांका बर्वे, , शाल्मली खोलगडे, महेश कोठारे, , साजिद नाडीयावाल, मिथीला पालकर, राणा कपूर, अतुल कसबेकर, मलिष्का, गौतम सिंघानिया, हनुमंत गायकवाड, नितीन जाधव, अरूण लखानी, अभय जोशी, अजिंक्य पाटील, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, गुलशन ग्रोव्हर, डिनो मोर्या, सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचीही उपस्थिती असणार आहे. या सेलिब्रिटींच्या फॅशन स्टाईल, फॅशन स्टेटमेंटकडे साऱ्यांच्या नजरा असतील. आज होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची बिंत्तमबातमी जाणून घेण्यासाठी भेट द्या http://www.lokmat.com/MMS-awards-2017-live/ या संकेतस्थळावर.- युथ आयकॉन म्हणून शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा लूकही कायमच चर्चेत असतो. राजकारणाचं व्यासपीठ असो, इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो, प्रत्येक वेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्यात आदित्य ठाकरे यांची स्टाईलही आकर्षण ठरणार आहे.