शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांना मिळाले जीवदान

By admin | Updated: November 4, 2016 01:04 IST

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या डायल १०८ सेवेच्या रुग्णवाहिकेमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ११ हजार २६९ बालकांनी जन्म घेतला

पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या डायल १०८ सेवेच्या रुग्णवाहिकेमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ११ हजार २६९ बालकांनी जन्म घेतला असून, ही सेवा माता व बालकांसाठी वरदान ठरल्याचे चित्र आहे. शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ही इमर्जन्सी सेवा चालू केली होती. तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांत राज्यभरातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विविध आपत्कालिन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांनी या सेवेला सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी जीवावर बेतणाऱ्या कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीत १०८ हा क्रमांक डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह आपण सांगितलेल्या ठिकाणी येते. यामध्ये अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेडया सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) सेवेच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका या सेवेसाठी राज्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये २३३ ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका असून, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका समाविष्ट आहेत. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, की ग्रामीण भागामध्ये काही वेळा दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आजही बाळंतपणात होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी १०८ सेवेशी संपर्क केल्यास पुढील त्रास वाचू शकतो. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर न केल्यास गरजू महिलेला वेळेत मदत मिळून मातामृत्यू व अर्भकमृत्यू टाळता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)>महिलांना वरदान : नाशिकमध्ये ७३१ बालकांचा रुग्णवाहिकेत जन्म राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ही सेवा असून, रुग्णवाहिकेत प्रसूती झालेली आकडेवारी मोठी आहे. यातही नाशिक जिल्हा आघाडीवर असून, २ वर्षांत नाशिकमधील ७३१ बालकांनी रुग्णवाहिकेत जन्म घेतला आहे. तर, त्या खालोखाल पुण्यातील ७०२ बालकांनी रुग्णवाहिकेत जन्म घेतला असल्याचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे. अशाप्रकारे बाळंतपणासाठीही ही सेवा वरदान ठरली असून, राज्यभरातील महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे. जानेवारी २०१४ च्या अखेरीस सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. ही सेवा २४ तासांसाठी उपलब्ध असून, कोणत्याही आपत्कालिन प्रसंगी दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते. त्यामुळे शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. - डॉ. ज्ञानेश्वर शेळके, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी