शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांनो, १८२ हेल्पलाइनला द्या प्रतिसाद

By admin | Updated: July 19, 2016 03:58 IST

ट्रेनमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा वेळी महिला प्रवाशांनी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनची मदत घ्यावी

मुंबई : ट्रेनमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा वेळी महिला प्रवाशांनी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनची मदत घ्यावी, असे आवाहन करतांनाच, या हेल्पलाइनला अधिकाधिक लोकप्रिय करण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. या हेल्पलाइनला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हेल्पलाइन जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात आहे. या संदर्भात आरपीएफकडून एका पत्रकार परिषदेद्वारे माहिती देण्यात आली.मुंबई विभागात तुलनेने कमी प्रमाणात तक्रारी येतात आणि मदत मागितली जाते. त्यामुळे या हेल्पलाइनला जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरपीएफ जवानांना महिला सुरक्षा व संबंधित तक्रारींचा आढावा घेण्याचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. स् खासकरून महिला प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षेसाठी या हेल्पलाइनची मदत घ्यावी, असे आवाहन आरपीएफचे महानिरीक्षक व मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. सिंह आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)>महिलांच्या डब्यात पुरुष प्रवाशांची घुसखोरीमहिला डब्यात पुरुष प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. २0१५ मध्ये १७ हजार १६१ जणांवर कारवाई करण्यात आली, तर २0१६ च्या जून महिन्यापर्यंत ८ हजार १६७ जणांवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली. महिला प्रवाशांच्या माहितीसाठी बुकलेटमहिला प्रवाशांच्या माहितीसाठी एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. त्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दल आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने अनावरणही करण्यात आले. यात एखादा प्रसंग उद्भवल्यास महिलेने त्या प्रसंगाला कसे तोंड द्यावे, तसेच ती परिस्थिती कशी हाताळावी, रेल्वे पोलिसांना त्याची माहिती कशी द्यावी इत्यादी माहिती यात आहे.