शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार द्या अन् रेशनकार्ड न्या !

By admin | Updated: May 18, 2016 01:36 IST

कागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतोकागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतो

मंगेश पांडे, सुवर्णा नवले, किरण माळी,

पिंपरी- कागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतो, मात्र त्यासाठी अडीच हजार रुपये देण्याची तयारी ठेवा, अशी खुली आॅफर निगडीतील परिमंडल अधिकारी कार्यालय ‘अ’ विभागासमोर उभ्या असलेल्या एजंटांनी दिली. ही बाब मंगळवारी लोकमत प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली.निगडी येथील टिळक चौकातील संत तुकाराम व्यापार संकुलातील पहिल्या मजल्यावर ‘अ’ परिमंडल कार्यालय आहे. या इमारतीच्या बाहेरच एजंट घिरट्या घालत असतात. कोणीही व्यक्ती त्या परिसरात आला, तरी त्याला घेरले जाते. कार्यालयाच्या आवारातच नव्हे, तर कार्यालयाच्या दारात अन् कार्यालयाच्या आतही एजंटांंनी बस्तान मांडले आहे. जड आवाजात ‘इकडे या. काय काम आहे? रेशनिंग कार्डचे काम मी करून देतो, कार्यालयात जाऊन काही उपयोग नाही. तिकडे काम दिल्यास महिनोन् महिने हेलपाटे मारावे लागतील,’ असे बोलून इमारतीच्या खालीच संबंधित नागरिकाला भांबावून सोडले जाते. नवख्या व्यक्तीला तर अक्षरश: दमात घेतले जातअसून,कागदपत्रे हातात घेऊन आलेली व्यक्ती एजंटांच्या नजरेतून सुटत नाही. कार्यालयाच्या परिसरात आल्या आल्या, त्याला बाजूला घेऊन दलाल एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे त्यांच्या हातातील कागदपत्रे ताब्यात घेतात. शिवाय हेलपाटे मारायचे असतील, तर कार्यालयात जा.त्यापेक्षा माझ्याकडे द्या काही दिवसांतच करून देतो, असे ठोसपणे सांगितले जाते. तासाभरात केले जाते काम ज्या कामाला काही दिवस, महिने लागतात. तेच काम तासाभरात करून देतो, असा शब्द एजंटकडून दिला जातो. त्यानंतर पैसे आणि शिधापत्रिका घेतली, की थेट कार्यालयातील अधिकाऱ्याकडूनच एजंट काम करवून घेतो. अधिकारीदेखील रीतसर प्रक्रियेने आलेल्या कामापेक्षा दलालांकडून आलेल्या कामास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर बसूनच काम करतात.