शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कर्जमाफी होईपर्यंत शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत द्या- रावते

By admin | Updated: June 13, 2017 13:33 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12-  राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दहा हजार रूपयांची मदत करण्याची मागणी केली आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतर आठ दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी करा नाहीतर पीककर्ज घेताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. तसंच कर्ज मिळेपर्यंत बी-बियाणं विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रूपये मदत द्या, अशी मागणी कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. बैठकीत ही मागणी केल्यानंतर सर्व मंत्र्यांनी एकमताने या मागणीला मान्यता दिली आहे. 
 
 
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे निकष ठरवण्यासंदर्भात कॅबिनेटची बैठक घेण्यात आली आहे. कर्जमाफी देताना कशाप्रकारे खबरदारी घ्यायची, याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारच्या आज बैठकीत काय निर्णय होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. यात शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देणार असल्याचं सरकारने घोषित केलं होतं. या घोषणेनंतर सोमवारी सकाळपासून मंत्रीगटाच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या होत्या. 
कर्जमाफीसाठी जमिनीची कुठलीही अट नसेल असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर करदात्यांना कर्जमाफीतून वगळण्याचे संकेतही चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत. त्यामुळं नोकरदारांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. 
 
तुम्ही तुमचं बघून घ्या- अरूण जेटली
 
शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून शेतक-यांची कर्जमाफी करावी असं म्हणत अरूण जेटलींनी एकप्रकारे कर्जमाफीपासून हात झटकले आहेत.  राज्य सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकार त्यांची मदत करणार नाही, स्वतःच्या निधीतून राज्यांनी कर्जमाफी करावी असं जेटली म्हणाले. महाराष्ट्रासारखे राज्य कर्जमाफीच्या बाजुचे आहे, त्यांनी स्वतःच्या खर्चातून कर्जमाफी करावी. “ज्या राज्यांना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायची आहे, त्यांना स्वतःच आपले उत्पन्नाचे स्त्रोत स्वत:च शोधावे लागतील”,  असं जेटली म्हणाले आहेत. 
 
आणखी वाचा
 

कर्जमाफी! केंद्र सरकारने झटकले हात, जेटली म्हणाले तुमचं तुम्ही बघून घ्या

 
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार समर्थ
 
शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायला राज्य सरकार समर्थ असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. जीएसटीमुळे राज्य सरकारला सुमारे 17 हजार कोटी रूपयांची अतिरीक्त लाभ मिळणार आहे…त्यातून कर्जमाफीसाठी पैसा उभा करु असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारकडे पैसा उभारण्यासाठी इतर अनेक मार्ग असल्याचं मुटंगटीवार म्हणाले. आहेत.
 
आणखी वाचा
 

शेतकरी कर्जमाफीला जमीनमर्यादा नाही