शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना निवडणुकीपूर्वी विशेष पॅकेज द्या!

By admin | Updated: January 18, 2017 02:33 IST

आताच काय ते ज्येष्ठांसाठी विशेष पॅकेज द्या, जेणेकरून नंतर पाच वर्षे कार्यालयांच्या पायऱ्यांवर काठी टेकवायला नको

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर रोज दिसणारा नगरसेवक निवडून आल्यानंतर मात्र दिसेनासा होता. त्यामुळे आताच काय ते ज्येष्ठांसाठी विशेष पॅकेज द्या, जेणेकरून नंतर पाच वर्षे कार्यालयांच्या पायऱ्यांवर काठी टेकवायला नको, असे मुलुंडमधील आजोबांचे म्हणणे आहे.मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीच्या पदपथावर नगरसेवकाने ज्येष्ठांसाठी आसनव्यवस्था करून दिली. मात्र, काही वर्षाने येथील आसनव्यवस्थेवर बसणे ज्येष्ठांना अवघड झाले. आसनव्यवस्थेची दुरवस्था झाली. त्यांनी नगरसेवकांकडे पुन्हा धाव घेतली. पाठपुराव्याअंती नवे बाकडे बसविण्यात आले. मात्र, पूर्वीचे बाकडे तसेच तुटलेल्या अवस्थेत पडून होते. ते न काढल्यामुळे त्यांच्या डोकेदुखीत आणखीन भर पडली. अखेर या ज्येष्ठ मंडळींनी एका मजुराला खिशातून ५० रुपये देऊन हे बाकडे हटविण्याची वेळ आली. मंगळवारी त्यांनी हे बाकडे हटविले. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे आजूबाजूला उखडलेले पेव्हर ब्लॉक एक समान करणे शक्य नसल्याचे नगरसेवकाने सांगितले आहे. त्यामुळे किमान निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत या मंडळींना या खड्डेयुक्त पदपथावरील आसनव्यवस्थेवर वेळ घालवावा लागणार आहे. जवळपास १५ ते २० ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक कट्टा बनला आहे. बँक, सरकारी नोकरी, हॉस्पिटल, पालिका अशा विविध ठिकाणांतून ही मंडळी निवृत्त झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी विरंगुळा म्हणून ही मंडळी एकत्र येतात. त्यांच्यातही निवडणुकीच्या गप्पा रंगलेल्या. सगळेच जण पैसे देऊन मतदारांना आपल्याकडे ओढतात आणि गरज संपली की, लाथ मारतात. त्यामुळे ‘खिसा गरम झाला की मतदानाचा विचार करू’ असे मिश्कील मत ८० वर्षांचे आजोबा बी.एस. पांचाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. आता फक्त कामापेक्षा फक्त पैसा म्हणून निवडणुकीकडे पाहिले जात असल्याचे, ७० वर्षांचे रवीकांत राणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरसेवकाने नेहमीच नागरिकांच्या मदतीसाठी हजर राहावे, अशी माफक अपेक्षा ते करत आहेत. ज्येष्ठांना बसण्यासाठी शेड असलेली आसनव्यवस्था, वाचनालयाची सोय करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.