शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

गटनेत्यापेक्षा ज्येष्ठ नगरसेवकाला संधी द्या

By admin | Updated: April 30, 2016 00:23 IST

ज्येष्ठ नगरसेवकाला द्यायला हवी अशी कुजबुज भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षात होत आहे.

पुणे : महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी स्थापन केलेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्वतंत्र कंपनीच्या संचालकपदी पक्षाच्या गटनेत्यांची निवड न करता ती संधी ज्येष्ठ नगरसेवकाला द्यायला हवी अशी कुजबुज भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षात होत आहे. पदसिद्ध संचालकांच्या पक्षांशिवाय ज्या अन्य दोन राजकीय पक्षांना संधी मिळणार आहे, त्यात भाजपा व मनसे या पक्षांचा समावेश आहे.कंपनीबाबतच्या केंद्र व राज्य सरकारच्या अध्यादेशामध्ये संचालक मंडळाची रचना दिलेली आहे. त्यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, सभागृहनेते हे पदसिद्ध संचालक असतील, असे नमूद आहे. हे पदसिद्ध संचालक ज्या राजकीय पक्षांचे असतील त्या पक्षांशिवाय ज्या राजकीय पक्षांची सदस्य संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी १ सदस्य याप्रमाणे २ संचालक घेण्यात येतील, असे त्यात स्पष्ट करण्यात आले. त्यात कुठेही त्या पक्षांचे गटनेते असे म्हटलेले नाही. त्याचाच आधार घेत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. गणेश बिडकर पालिकेतील भाजपाचे व राजेंद्र वागसकर मनसेचे गटनेते आहेत. पालिकेतील पक्षाच्या कामकाजाच्या सोयीसाठी म्हणून गटनेतेपद निवडण्यात येते. महापौर, आयुक्त यांनी बोलावलेल्या बैठकांना गटनेते उपस्थित असतात. पक्षासाठी काम करूनही पदांची संधी न मिळालेले काही ज्येष्ठ नगरसेवक दोन्ही पक्षांमध्ये आहेत. स्मार्ट सिटीसाठीची त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र कर्मचारी, स्वतंत्र कार्यक्षेत्र, स्वतंत्र अंदाजपत्रक अशा बऱ्याच गोष्टींची सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळेच संचालक पदाची संधी मिळावी, अशी दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नगरसेवकांची भावना आहे. (प्रतिनिधी)सर्वसहमतीने निर्णय घेऊमाझ्यासमोर हा विषय गुरुवारी रात्रीच आला आहे. अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र आज रात्री सर्वांबरोबर चर्चा करून नाव निश्चित करू व तसे महापालिकेतील पक्षनेतृत्वाला कळवण्यात येईल.- योगेश गोगावले,शहराध्यक्ष-भाजपाशक्यतो नवा चेहरा असावा असाच आमचा प्रयत्न आहे, मात्र याबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील. उद्या नाव जाहीर करू.- हेमंत संभूस, अध्यक्ष, मनसे