शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला १५ रुपये हमीभाव द्या

By admin | Updated: May 20, 2016 02:01 IST

‘कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा,’ असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ‘शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले;

चाकण : ‘कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा,’ असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ‘शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय?’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला. कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी चाकण येथे गुरुवार (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा महामार्गावर ओतून दिला. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. खा. शेट्टी म्हणाले, की १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली व शेतकऱ्यांचे संघटन करून कांद्यासाठी आंदोलन केले. ३५ वर्षांनंतरही शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतमालाचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने जीवनावश्यक वस्तू १९५५ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. पाकिस्तानहून ४० रुपये किलोने कांदा आयात करून शासन येथील शेतकऱ्यांना मातीत घालते, म्हणजे शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आहे काय?उद्योजकांनी सव्वा लाख कोटींचे कर्ज थकविले म्हणून बँकिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजकांना वसुलीचा तगादा लावू नये म्हणून बँकांना २५ हजार कोटी दिले जातात. दुसरीकडे शेतकऱ्याने कर्ज थकविले तर नोटीस फलकावर नाव लावता, त्यांच्या जमिनी लिलाव करून विकता, याचा निषेध केला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी तडफडून मेला नाही, पण कांद्याला २/४ रुपये भाव मिळाला म्हणून कर्ज फेडता आले नाही, म्हणून शेतकरी गळफास घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीकाही शेट्टी यांनी केली. (वार्ताहर)कांदा उत्पादनाचा खर्च किलोमागे १३ रुपये येत असून, सरकार कांद्याला तीन ते सहा रुपये भाव देत असेल, तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही सरकारने दिली होती, म्हणून कांद्याला किमान १५ रुपये हमीभाव मिळाावा. याशिवाय प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, - खा. राजू शेट्टी, नेते स्वाभीमानी शेतकरी संघटना ळ