शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात जीव देणार होतो! - सूरज परमार यांची पत्रात चुकांची कबुली

By admin | Updated: February 5, 2016 12:01 IST

मी कोणाला ठार मारू शकत नाही, म्हणून मी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भीती माझ्या मनाला सतत बोचत आहे

ठाणे : मी कोणाला ठार मारू शकत नाही, म्हणून मी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भीती माझ्या मनाला सतत बोचत आहे. मी स्वत:ला अपघातात संपविणार होतो. मात्र, तसे केले असते तर बिल्डरांच्या व्यथा समजल्या नसत्या. म्हणून, अखेर मी आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे बिल्डर सुरज परमार यांनी आपल्या २० पानी चिठ्ठीत नमूद केले आहे.परमार प्रकरणात पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात परमार यांनी लिहिलेले संपूर्ण पत्र समाविष्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राजकारणी, सरकार यांच्याबद्दल नाराजी प्रकट करतानाच आपल्या व्यवसायात झालेल्या चुकांची कबुली त्यांनी दिली आहे.सरकारच्या प्रत्येक योजनेचा उद्देश हा थेट अर्थकारणाशी असून पैसे कसे उकळता येतील, याला जणू प्राधान्य दिले जाते. बिल्डरला बडा बकरा समजले जाते. जनमानसामध्ये आमची प्रतिमा चोर, अशी निर्माण करण्यात आली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. माझ्या गैरव्यवस्थापनामुळे मला कोणाला तोंड दाखवायची लाज वाटत होती. परंतु, आपल्या मुलांना सांग, तुमचे वडील फसवे नव्हते, असे परमार यांनी पत्नीला उद्देशून लिहिले आहे. इन्कम टॅक्स विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर मी माहिती द्यायला नको होती. मात्र, मी त्या वेळी प्रचंड दबावाखाली होतो, असे सांगत त्यांनी आपल्या भागीदारांची माफीदेखील मागितली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या घोडचुका, कायद्याचा व्यवस्थित अभ्यास न करता वकिलांनी दिलेला चुकीचा सल्ला, भिवंडी, पुणे आणि काव्या प्रकल्पासाठी टायटल क्लीअर नसताना केलेली जमीनखरेदी, भागीदारांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीचा केलेला गैरवापर व कॉसमॉसमध्ये झालेल्या सगळ्या गैरव्यवस्थापनास मीच एकटा जबाबदार असल्याची धक्कादायक कबुली त्यांनी या चिठ्ठीत दिल्याची माहिती आता उघड झाली आहे. मी स्वत:ला खूप स्मार्ट समजत होतो, परंतु मी मूर्खच निघालो, असा उल्लेख करताना आपण कशा प्रकारे चुका केल्या, त्याचा पाढाच त्यांनी या चिठ्ठीत वाचला आहे. माझे सहकारी आणि कुटुंबीयांचा माझ्यावर खूप विश्वास होता. परंतु, मी कंपनीचा कारभार योग्य प्रकारे सांभाळू शकलो नाही. त्यामुळे घरातील लग्नसोहळ्यासाठी आपल्या घरी पाहुणे येत असताना मी हे जग सोडून चाललोय. गेल्या दोन महिन्यांपासून मी दडपणाखाली होतो, असे परमार यांनी नमूद केले आहे.भिवंडीत काव्या आणि फायबर ग्लासचे प्रकल्प हाती घेतले, मात्र ते लालफितीच्या कारभारात रखडले. योगी प्रकल्पातली गुंतवणूक चुकीची ठरली. ज्वेलचा प्लॅन चेंज केल्यामुळेच त्याच्या परवानग्या रखडल्या. ती माझी घोडचूक होती, अन्यथा हा प्रकल्प मार्गी लागला असता. प्रकल्पांना ओसी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत होतो. मात्र, काही ठिकाणी दंड तर काही ठिकाणी नियम आडवे येत असल्याने माझी कोंडी होत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. भिवंडीत अरु ण पाटील यांच्या प्रकल्पात पुढे काही करू नकोस. तिथे गुंतविलेले पैसे विसरून जा, असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलांना या चिठ्ठीत दिला आहे. (प्रतिनिधी)बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी सुरू झालेली सुनावणी अतिरिक्त वेळेअभावी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकण्यात आली आहे. या वेळी परमारांनी बांधकामांसंदर्भात त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तसेच गोल्डन गँगही सिंगल बिझनेस मॅनला ब्लॅकमेल करी. त्याचबरोबर त्यांना फ्री बंगले मिळावेत, अशी मागणी झाली होती. मात्र, त्यांनी ते बंगले दिले नसल्याचे अशिलांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परमार आत्महत्येप्रकरणी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चार नगरसेवकांपैकी विक्र ांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी न्यायामूर्ती व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात सुरू झाली.