शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला प्रवेश द्या!

By admin | Updated: July 18, 2014 01:01 IST

बारावी उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना १० टक्के जागांचा बोनस देण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु मागेल त्याला प्रवेश

राज्य शासनाचे निर्देश : विद्यापीठात २९ महाविद्यालयांना मिळाली जागा वाढनागपूर : बारावी उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना १० टक्के जागांचा बोनस देण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाने दिले होते. परंतु मागेल त्याला प्रवेश मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेत वेळ पडली तर महाविद्यालयांना अधिक जागा वाढवून देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दिले आहेत. यंदा बारावीच्या निकालात १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे बारावीचा निकाल लागून महिना उलटला असला तरी अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने महाविद्यालयांना १० टक्के जागा वाढ देण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले होते. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(सी) नुसार विद्यापीठाला प्रवेशक्षमता मंजुरीच्या असलेल्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जास्तीच्या प्रवेशाचा निर्णय विद्वत परिषदेत घेण्यात आला होता. परंतु अनेक ठिकाणी १० टक्के जागा वाढदेखील पुरेशी नसल्याच्या तक्रारी जनप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे केल्या होत्या. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंना १० टक्के अतिरिक्त वाढीऐवजी जर जागा वाढवून देणे शक्य असेल तर त्यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. विद्यापीठाने माहितीच दिली नसल्याची महाविद्यालयांची तक्रारकिमान शिक्षक नियुक्तीच्या कडक निकषांमुळे नागपूर विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांनी विनाअनुदानित जागांवर प्रवेश देणे बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये या शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या अखत्यारितील महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यासंदर्भात माहितीच देण्यात आली नसल्याचे काही महाविद्यालयांनी सांगितले आहे. यासंदर्भात ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याशी संपर्क साधला असता यात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संबंधित पत्र असल्याचा उल्लेख त्यांनी केला.(प्रतिनिधी)महाविद्यालयांना मिळाला जागांचा ‘बोनस’महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात मंजूर प्रवेश क्षमतेनुसार, प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असल्यास १० टक्के जास्तीचे प्रथम वषार्साठी प्रवेश मंजूर करण्याकरिता विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. काही महाविद्यालयांनी अशा आशयाच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे म्हटले असले तरी बऱ्याच महाविद्यालयांनी मात्र विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठविले होते. यानुसार गुरुवारी २९ महाविद्यालयांना प्रभारी कुलगुरूंच्या मान्यतेनंतर वाढीव जागांसाठी मंजुरी देण्यात आली.