शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेच्या जुन्या नोटा द्या; दहाचे ठोकळे न्या!

By admin | Updated: November 17, 2016 21:58 IST

पाचशे, हजारांच्या नोटा बँकेस द्या व त्याच्या बदलीत पाचशे रुपयांची, दहा रुपयांची नाणी घेऊन जा, अशी अभिनव योजना म्हसवड येथील माणदेशी महिला सहकारी बँकेने राबविली.

आॅनलाईन लोकमतम्हसवड, दि. 17 : पाचशे, हजारांच्या नोटा बँकेस द्या व त्याच्या बदलीत पाचशे रुपयांची, दहा रुपयांची नाणी घेऊन जा, अशी अभिनव योजना म्हसवड येथील माणदेशी महिला सहकारी बँकेने राबविली. आठवडा बाजार दिवशी राबविलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी आली आहे.

केंद्र सरकारने चलनातून रद्द केलेल्या पाचशे, एक हजारांच्या नोटा जमा करून त्या बदलीत नवीन नोटा देण्याची सुविधा विविध बँकांतून केलेली आहे. चलनात नवीन आलेल्या दोन हजारांच्या नोटा प्रत्यक्ष व्यवहारात वापरताना सुटे करताना नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ही वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यामुळे प्रत्येकी दहा रुपयांची पन्नास नाणी बँकेच्या माध्यमाने ग्राहकांना केवायसी पाहून आठवडा बाजारा दिवशी उपलब्ध करून बँकेने सर्वसामान्यांची सुट्या पैशांअभावी होणारी ससेहोलपट काहीअंशी थांबवण्यात यश मिळविले आहे.

गेल्या आठवडा बाजारात अनेक नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा असल्याने बाजारहाट करताना व्यापाऱ्यांनी त्या नोटा घेण्यास असमर्थता दाखवल्याने खरेदी-विक्री न करता रिकामी पिशवी घेऊन घरी परतावे लागले होते. नागरिकांची होणारी ही अडचण ओळखून माणदेशी बँकेने बुधवार आठवडा बाजारादिवशी बाजारतळावरच सुटे पैसे उपलब्ध करून दिल्याने नागरिकांच्यातून बँकेच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

चलनातून हजार, पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत. त्या बदलण्यासाठी बँकेच्या दारात तासन्तास उभे राहावे लागत आहे. तसेच बाजारपेठेत जुन्या नोटा चालत नसल्याने चलनातील नोटा मिळविण्यासाठीही दिवसभर बँकेत थांबावे लागते. बहुसंख्य एटीएम बंद आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांचे हाल होत असल्याने अर्थव्यवस्था कोलमडली असताना माणदेशी बँकेने घेतलेल्या अनोख्या उपक्रमामुळे माणदेशी माणसाला कसलाही फटका बसलेला नाही. त्यामुळे माण तालुक्यातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे