शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख विहिरींचे पुरावे द्या - राज ठाकरे

By admin | Updated: April 21, 2016 03:22 IST

रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : रोजगार हमी योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षांपासून व्यवसायकर वसूल करीत आहे. या पैशांचा शासनाने काय विनियोग केला, याची माहिती दिली पाहिजे. राज्य शासन ३० लाख विहिरी बांधल्याचा दावा करीत आहे. या विहिरींचे पुरावे त्यांनी दिले पाहिजेत, असे प्रतिपादन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. लातूर येथील न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतर ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट व येडोळा शिवारात मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या समवेत माजी आ. बाळा नांदगावकर, मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते नितीन देसाई, एसटी कामगार सेनेचे अविनाश अभ्यंकर यांच्यासह स्थानिक पदाधिरी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मी ३० लाख विहिरींचा हिशोब मागतो आहे. मात्र, शासनाने अद्यापपर्यंत एकही पुरावा दिला नसल्याचे सांगत नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेल्या पैशांचा सरकारने हिशेब दिला पाहिजे. तसेच या पैशातून नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. तुळजापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर जळकोट येथे मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या ओढा पात्राच्या रुंदीकरण, खोलीकरण व पुनरूज्जीवनाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टा पाटीजवळ मोरे पुलाच्या नाल्याची बांध-बंदिस्ती व येडोळा गावाजवळील बोरी नदीपात्राच्या रूंदीकरण व खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली.