शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आईला पोटगी द्या!

By admin | Updated: March 3, 2016 04:56 IST

७२ वर्षीय वृद्ध आईला तिचा उदरनिर्वाह, औषधोपचाराचा खर्च करता यावा, यासाठी दोन्ही मुलांनी पाच हजार व २५०० रुपये, अशी एकूण ७५०० रुपयांची पोटगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल पंढरपूर

पंढरपूर : ७२ वर्षीय वृद्ध आईला तिचा उदरनिर्वाह, औषधोपचाराचा खर्च करता यावा, यासाठी दोन्ही मुलांनी पाच हजार व २५०० रुपये, अशी एकूण ७५०० रुपयांची पोटगी द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल पंढरपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. माने यांनी दिला आहे. गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी पवार (वय ७२) या वयोवृद्धेने तिच्या मुलांविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. थोरला मुलगा सुभाष पवार (वय ४३) याच्या नावे २७ एकर तर धाकटा भीमरावच्या (वय ४१) नावे ११ एकर बागायती शेतजमीन असूनही ही दोन्ही मुले आईचे संगोपन करत नाहीत. उदरनिर्वाह व औषधोपचारासाठी पैसे मागितल्यास त्यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते. घरातून बाहेर काढले जाते, अशी तिची तक्रार होती. दोघांच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये ते वर्षाला ऊस, मका, गहू आदी पिके घेतात. त्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाखांच्या आसपास आहे. सक्षम परिस्थिती असूनही ते संगोपनास टाळाटाळ करीत असल्याचे वृद्ध आईने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. वृद्ध आईची मागणी मान्य करत थोरला मुलगा सुभाष यांनी प्रतिमहा पाच हजार तर धाकटा भीमराव याने २५०० रूपये भत्ता द्यावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. माने यांनी दिला आहे. वृद्ध महिलेतर्फे अ‍ॅड. आर. बी. घोगरदरे यांनी न्यायालयात कामकाज पाहिले.