शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा अहवाल १ जुलैला द्या

By admin | Updated: May 30, 2016 02:36 IST

रासायनिक प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळास शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी चांगलेच फटकारले

कल्याण : डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पट्ट्यातील औद्योगिक कारखान्यांतून होणाऱ्या रासायनिक प्रदूषणप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळास शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी चांगलेच फटकारले. यावेळी केंद्रीय प्रदूषण मंडळास १ जुलैला कारवाईचा अहवाल सादर करण्यास शेवटची संधी दिली आहे. अन्यथा, संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे लवादाने स्पष्ट केले आहे. कारखाने रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट उल्हास नदी, कल्याण खाडी व वालधुनी नदीत सोडत आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असल्याप्रकरणी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी यांनी हात वर केले होते. याप्रकरणी संबंधित संस्थांना १०० कोटींचा दंड ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने दंड भरण्यावरील उच्च न्यायालयाची स्थगिती उठवली आहे. त्याची सुनावणी जुलैत होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणप्रकरणी प्रतिज्ञापत्र लवादाकडे सादर करून प्रदूषण होत असल्याचे मान्य केले. लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ बंद करून त्याचा ताबा घ्यावा, असे सूचित केले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कार्यवाही न केल्याने केंद्रीय वन व पर्यावरण खात्याच्या संचालकांना १० कोटींचा दंड व तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा इशारा लवादाने दिला होता. वन व पर्यावरण खात्याच्या संचालकांनी स्वत: लवादाच्या शुक्रवारी झालेल्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेशदिले होते. लवादाने केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पण, अहवाल सादर न केल्याने लवादाने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला चांगलेच धारेवर धरले.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपली ओळखच गमावली आहे, असे मत लवादाने नोंदवले. डोंबिवली परिसरातील प्रदूषणाचा गंभीर विषय असतानाही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. लवादाने सर्व संबंधित सरकारी विभाग व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत सक्त ताकीद दिली. केंद्र व राज्य सरकारने दोन महिन्यांत करवाईच न केल्यामुळे कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. याबाबत टिप्पणी करताना लवादाने असे मत नोंदवले की, हा एकतर निष्काळजीपणा आहे किंवा अक्षम्य दुर्लक्ष आहे. अनेकदा सविस्तर कारणमीमांसा करून आणि आदेश देऊनही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने काहीही कारवाई केली नाही. दुर्दैवाने, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र खरे मानून त्यावर विश्वास ठेवला. (प्रतिनिधी)