शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना ‘ए २’ची कामे द्या

By admin | Updated: July 4, 2016 03:12 IST

नवी मुंबईमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर अनेक जण बेरोजगार झाले.

पनवेल : नवी मुंबईमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यानंतर अनेक जण बेरोजगार झाले. काहींनी नोकरी करणे पसंत केले तर काही जण पोटाची खळगी भरण्यासाठी सिडकोमार्फत मिळणारी कामे करू लागले. सिडको प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना ए (२) अंतर्गत विविध कामे प्रत्येक नोडमध्ये दिली जातात. मात्र ही कामे करताना सिडकोने विविध मर्यादा व नियमावली लादल्याने प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सिडकोमार्फत मिळणारी कामाची मर्यादा सुरुवातीला ५ लाखापर्यंत होती. आता ही मर्यादा ३ लाखांपर्यंत करण्यात आल्याने त्यावरील रकमेचे ई-टेंडरिंग करण्यात येते. त्यामुळे प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या कामावर आपोआपच मर्यादा आल्या. विशेष म्हणजे सिडको प्रशासकीय कारभारात यापूर्वी एकच मुख्य अभियंता कार्यरत होता. मात्र या पदाव्यतिरिक्त उत्तर, दक्षिण व विशेष रेल्वे प्रकल्प अशा तीन पद्धतीत विभागणी करण्यात आल्याने कामांचे वर्गीकरण होऊन प्रकल्पग्रस्तांना मिळणारी कामे कमी झाली आहेत. ही बाब सिडकोच्या निदर्शनास आणून देखील सिडकोे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पनवेल तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे स्थानिक सिडको धोरणानुसार यापूर्वी टेंडरमध्ये १0 टक्के राखीव व इतर १0 टक्के कामे ही प्रकल्पग्रस्तांसाठी देण्याचे धोरण होते. स्थानिक ठेकेदार संघटनेने सिडको सहव्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना पत्र लिहून यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शासन नियमानुसार आमदार निधीतून सुमारे १0 लाखापर्यंतही कामे ई-टेंडरिंगशिवाय केली जाऊ शकतात. तर हा नियम सिडको प्रकल्पग्रस्तांसाठी का नाही? अशी मागणी भरत पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)>प्रकल्पग्रस्त ठेकेदारांची व्यथास्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडे अद्ययावत यंत्रसामग्री नाही. त्यामुळे अधिक मूल्यांकनाची कामे करणे शक्य होत नाहीत. याउलट रजिस्टर्ड बाहेरील ठेकेदार प्रकल्पग्रस्तांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी कमी दराचे टेंडर भरतात. यामुळे ही कामे देण्याबाबत सिडकोने ठेकेदाराला स्वतंत्र पॉलिसी तयार केल्यास सिडको प्रकल्पग्रस्त ठेकेदार हा स्पर्धेमध्ये टिकेल, नाहीतर तो देखील रस्त्यावर येईल.