शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित कॉलेजांना ६वा वेतन आयोग द्या

By admin | Updated: January 8, 2017 04:03 IST

महाराष्ट्रातील विद्यापीठांशी संलग्न असलेल्या खासगी विनाअनुुदानित महाविद्यालयांमधील व अन्य उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहाव्या

- अजित गोगटे,  मुंबईमहाराष्ट्रातील विद्यापीठांशी संलग्न असलेल्या खासगी विनाअनुुदानित महाविद्यालयांमधील व अन्य उच्चशिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही सहाव्या वेतन आयोगानुसार पगार मिळण्यास पात्र आहेत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यामध्येही केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग केव्हा लागू होतो, याची इतरांना प्रतीक्षा असताना, सर्वोच्च न्यायालयाने विनाअनुदानित कॉलेजांमधील कर्मचाऱ्यांना १० वर्षांपूर्वीच्या त्या आधीच्या वेतन आयोगाचा हक्क बहाल केला आहे.सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने १२ आॅगस्ट २००९ चा शासन निर्णय (जीआर) आणि ७ आॅक्टोबर २००९ची विद्यापीठ कायद्याखालील नियमावली असे दोन निर्णय घेतले होते. आॅगस्ट २००९ चा ‘जीआर’ शिक्षकांसंबंधी होता व वस्तुत: त्यात अनुदानित व विनाअनुदानित असा कोणताही भेदभाव न करता, सरसकट सर्वांना सहावा वेतन आयोग लागू होईल, असे नमूद करण्यात आले होते. आॅक्टोबर २००९मधील नियमावली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंबंधी होती व त्यात सहाव्या वेतन आयोगाच्या लाभांपासून विनाअनुदानित कॉलेजांमधील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले होते.असमर्थनीय निर्णयन्यायालय म्हणते की, विनाअनुदानित संस्थांना सरकारकडून अनुदान मिळत नसले, तरी विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण असते.वाढत्या महागाईशी मेळ घालण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा केली जाते. केंद्राने वेतन आयोग लागू केल्यावर, तो लागू करणे राज्यावर बंधनकारक नसले, तरी राज्याने एकदा तसा निर्णय घेतल्यावर, त्याच्या अंमलबजावणीत राज्य सरकार पक्षपात करू शकत नाही.