शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

By admin | Updated: November 18, 2015 02:40 IST

राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती

मुंबई : राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावर्षी पावसाळ््यात जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ५९.४० टक्केच पाऊस पडला. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के व १६ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे. औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती या विभागांमधील धरणांमध्ये आॅक्टोबर, २०१४ मध्ये ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरअखेर ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये राज्यात ६३ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरमध्ये ६५३ टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे की, जो मागील वर्षाच्या १० पटींपेक्षा जास्त असल्याचे खडसे यांनी सांगितले. राज्यात आॅक्टोबर अखेर रब्बी पिकांची फक्त ४३ टक्के पेरणी झालेली आहे. या टंचाईग्रस्त गावांमधील ५३.११ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३५७८.४३ कोटी रुपये मदतीची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)