शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मृतांच्या नातेवाइकांना १० लाख द्या

By admin | Updated: July 5, 2015 02:25 IST

दारूकांडातल्या मृतांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून ती वाढवून १० लाखांपर्यंत करावी, अशी मागणी शनिवारी मालवणी दारूकांड संघर्ष समितीने केली.

मुंबई : दारूकांडातल्या मृतांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून ती वाढवून १० लाखांपर्यंत करावी, अशी मागणी शनिवारी मालवणी दारूकांड संघर्ष समितीने केली. आर्थिक मदतीसह वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे इत्यादी मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याची भूमिकाही घेतली. दारूकांडानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाइकांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. दारूकांडात दगावलेल्यांपैकी बऱ्याच कुटुंबांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले. दारूकांडात दगावलेल्यांमध्ये पेंटर, बिगारी, कचरा वेचणारे आणि गटार साफ करणारे अशांचा समावेश होता. आधीच हलाखीची परिस्थिती त्यात कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. मृत्यू झालेल्यांकडे दारूडे म्हणून न पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत केली पाहिजे. मृतांना किमान १० लाख तर अपंगत्व आलेल्यांना ५ लाखांची मदत जाहीर करावी, मृतांच्या वारसांना सरकारी नोकर, मोफत शिक्षण द्यावे, अशी भूमिका संघर्ष समितीचे समितीचे सदस्य नारायण खराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. माझे पती मुख्तार बिगारी काम करत होते. दारू सोडण्याची विनंती मी त्यांना वारंवार केली. पण त्यांनी माझे ऐकले नाही. अखेर व्हायचे तेच झाले. सरकारने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली तर मी त्यांना खूप शिकवू शकेन. - कमरजहा,मुख्तार शेख यांची पत्नी माझी नातवंडे अनाथ झाली. दोन वर्षांपूर्वी सून कविता लेकरांना सोडून गेली. आता त्यांचा बापही गेला. आम्हाला अद्याप सरकार कडून मदत मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा करायलाही कोणी नाही. मी जिवंत असेपर्यंत कसाबसा मुलांचा सांभाळ करेन, पण माझ्या नंतर काय?- शांताबाई, मृत अर्जुनची आई