शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी पैसे नसल्याने मुलीची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:08 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना : दहावीत मिळाले होते ७२ टक्के गुण

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : वडील आॅटो चालवितात; तर आई मिळेल ते मोलमजुरीचे काम करते. या माध्यमातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीवर चार मुली आणि एका मुलाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार तरी कसा ? दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण पूर्ण झाले; परंतु पुढच्या शिक्षणासाठी पैसे कसे मिळणार? लग्नासाठीदेखील पैसे लागणारच, आदी प्रश्नांनी घेरल्या गेलेल्या पोहा येथील पल्लवी गोकुल तायडे (वय १६ वर्षे) या मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १७ जुलै रोजी उघडकीस आली. मृतक पल्लवी तायडे ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल, तीन बहिणी आणि एक भाऊ असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लहान-सहान आजार यासह भविष्यात लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असताना आई आणि वडील दोघांचीही दमछाक होत होती. अशा विदारक परिस्थितीत लहानाची मोठी झालेल्या पल्लवीने वसंत विद्यालय, पोहा येथे शिकत असताना कठीण परिश्रमातून दहावीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळविले होते. मात्र, पुढचे शिक्षण घ्यायचे म्हटले तर गाव सोडून शहरात जावे लागणार होते. दरम्यान, कमीत कमी खर्चात कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो, याची चाचपणी करीत असताना पल्लवीने तीन ते चार महाविद्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र, ११ वी नंतरचे शिक्षण कमी पैशात कदापि शक्य नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे अखेर तिने हलाखीच्या आर्थिक परिस्थितीसमोर गुडघे टेकत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली,असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे पोहा गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. ‘त्या’ मातेचा आक्रोश असह्य करणारा!चार मुली आणि एका मुलगा यामध्ये सर्वात मोठी असलेल्या पल्लवीने १७ जुलै रोजी घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेताच तिच्या आईने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना बोलावून तिचा गळफास सोडवून घेतला. तिला उपचाराकरिता कारंजाच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ जुलैच्या मध्यरात्री उपचारादरम्यान पल्लवीची प्राणज्योत मालवली. मुलीच्या अशाप्रकारच्या मृत्यूमुळे तिच्या आईने केलेला आक्रोश असह्य करणारा होता.