शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कन्या शाळेची इमारत होणार दुमजली

By admin | Updated: June 8, 2016 02:21 IST

नेरळ गावामधील शंभर वर्षे जुनी रायगड जिल्हा परिषदेच्या मालकी असलेली शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहे.

कर्जत : नेरळ गावामधील शंभर वर्षे जुनी रायगड जिल्हा परिषदेच्या मालकी असलेली शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहे. गेले वर्षभर ती इमारत नादुरु स्त असल्याने तेथे विद्यार्थी बसत नव्हते, त्यामुळे ती शाळा दोन सत्रात भरविली जात होती. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी त्या शाळेच्या नवीन दुमजली इमारतीसाठी २२ लाखांचा निधी मंजूर केला आहे.नेरळमध्ये कन्या शाळा नावाने जिल्हा परिषदेची शाळा भरविली जाते. गतवर्षी १ जून २०१५ रोजी या शाळेच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्या इमारतीच्या दुरु स्तीच्या मागणीसाठी या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनींच्या पालकांचा आग्रह होता. कर्जत पंचायत समिती त्या नादुरु स्त इमारतीकडे लक्ष देत नसल्याने पालकांनी आग्रह केल्याने दोन सत्रात वर्ग भरविले जात होते. शतक महोत्सवी वर्षाचा कार्यक्र म करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी नवीन दुमजली इमारत बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर ना हरकत दाखला प्राप्त होताच रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चार वर्गखोल्या मंजूर केल्या. साधारण २२ लाख रु पये खर्चून दुमजली इमारतीमध्ये चार वर्गखोल्या उभारण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून शंभर वर्षे जुनी शाळा जमीनदोस्त करण्याच्या कामास सुरु वात करण्यात आली. ९ जून रोजी दुमजली इमारतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी दिली. (वार्ताहर)