शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या विक्रीचे रॅकेट उघडकीस

By admin | Updated: December 12, 2015 02:37 IST

येथील मिसारवाडीतील विवाहितेच्या अमानुष छळ प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस तपासात मुलींची विक्री करणारे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे.

औरंगाबाद : येथील मिसारवाडीतील विवाहितेच्या अमानुष छळ प्रकरणाला कलाटणी मिळाली असून, पोलीस तपासात मुलींची विक्री करणारे मोठे रॅकेटच उघडकीस आले आहे. बुधवारी पोलिसांनी चार दलालांना अटक केल्यानंतर शुक्रवारी आणखी दोन दलाल महिलांना ताब्यात घेतले.संबंधित टोळीने गरीब कुटुंबांची फसवणूक करून अनेक मुलींना विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. छाया जाधव आणि आशा सोनवणे (दोघी, रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. सिडको पोलिसांनी याआधी मिसारवाडीतील पीडित विवाहितेची मानलेली मावशी सुवर्णा ऊर्फ शकुंतला वंजारे, सुखदेव सूर्यनारायण, सुरेखा बावणे, विठ्ठल पवार यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने गुरुवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ही टोळी गरीब कुटुंबांतील मुलींचा शोध घेऊन त्यांचे लग्न लावून देते. लग्न लावण्यासाठी वरपक्षाकडून पैसे वसूल केले जातात. विशेष म्हणजे मुलींचे आईवडील किंवा इतर नातेवाइकांना या आर्थिक व्यवहारात पूर्णपणे अंधारात ठेवले जात असे. या टोळीने मिसारवाडीतील अग्रवाल कुटुंबीयांना अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील ही मुलगी विकली होती. या व्यवहारात ९५ हजार रुपये त्यांनी वसूल केले. (प्रतिनिधी)मिसारवाडीतील पीडितेला ९५ हजारांत विकल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी दलालांची टोळी जेरबंद केली. या टोळीने राज्यभरात अनेक मुलींना विकल्याचे उघड झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. विक्री केलेल्या मुलींचा शोध घेण्यात येईल. त्यांनी तक्रार दिल्यास या टोळीवर आणखी गुन्हे नोंदविण्यात येतील. सामाजिक दृष्टिकोणातून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या शरद या मोठ्या मुलाच्या पत्नीलाही असाच त्रास दिल्याची माहिती मिळाली आहे. पीडित महिलेने तक्रार दिल्यास कारवाई करण्यात येईल, असेही अमितेशकुमार यांनी सांगितले.