शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो, हुंडा मागणाऱ्यांना नकार द्या

By admin | Updated: April 21, 2017 06:10 IST

कोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी..

नम्रता फडणीस , पुणेकोणतेही प्रश्न हे केवळ कायदा किंवा आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याने सुटतील ही समजूत चुकीची आहे. हुंड्याच्या प्रथेविरुद्ध मुलींनी स्वत:च आवाज उठवला पाहिजे. लग्नामध्ये हुंडा मागणाऱ्या मुलाला मुलींनीच नाकारले पाहिजे आणि कुटुंबासह समाजानेदेखील त्यांना साथ दिली पाहिजे तरच हुंडाबळीच्या घटनांना आळा बसेल, अशा शब्दांत अमृता देवेंद्र फडणवीस यांनी मुलींनाच स्वत:च्या हक्काची जाणीव करून देत हुंडाप्रथेवर टीकास्त्र सोडले.पुण्यात एका कार्यक्रमानिमित्ताने त्या आल्या असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीने लग्नाचा खर्च करणे शक्य नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला आणि अवघा महाराष्ट्र या घटनेने सुन्न झाला. आजही काही समाजामध्ये लग्नात हुंडा मागितला जातो, तो देण्याची ऐपत नसल्याने तरुणींना मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागते. कितीतरी मुली या छळाला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर बोलताना ‘मुलींनीच हुंड्याच्या प्रथेविरुद्ध एल्गार पुकारला पाहिजे’असे परखड विचार अमृता फडणवीस यांनी मांडले.त्या म्हणाल्या, दुष्काळाने एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जगण्यावरच घाला घातला आहे, तो नैराश्यामध्ये आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाला लग्नाचा खर्च करणे शक्य नाही. याचा विचार हुंडा मागणाऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांनी केला पाहिजे. हुंडा मागणाऱ्यांना समाजासमोर आणले पाहिजे. मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे केल्यास हुंडा मागणाऱ्या मुलाला नाकारण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल. त्यांच्या मतांचा कुटुंबीयांनीही सन्मान करायला हवा. तरच समाजाच्या मानसिकतेत बदल होईल. केवळ कायद्याने महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि आत्महत्या देखील त्यावरचा उपाय नाही, असेही त्यांनी सुनावले. ज्या गावातील कुटुंबाकडे लग्नासाठी पैसे नाहीत, त्यांनी सहकार्यासाठी ग्रामपंचायतीचा दरवाजा ठोठावला पाहिजे, त्यांच्याकडून नक्कीच आर्थिक मदत मिळू शकते. तसेच समाजानेही अशा कुटुंबाच्या हाकेला साद घातली पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)