शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

घरांना लावल्या मुलींच्या नावांच्या पाट्या

By admin | Updated: January 3, 2017 09:00 IST

पारतंत्र्य अनुभवणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पाईक व्हावी या उद्देशाने येवला येथील शिक्षक कॉलनीत घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

सर्वत्र कौतुक : महालखेडा शाळेतील शिक्षकांचा उपक्रम

दत्ता महाले, ऑनलाइन लोकमत

येवला (नाशिक) , दि. ३ -  स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार ,मुलामुलींमध्ये केला जाणारा भेद, हुंडाबळी हे बघितले की मन अगदी सुन्न होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यामुळे आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. तरीही तिच्या नशिबी असणारी हेळसांड थांबत नाही. ही खेदाची बाब आहे. पारतंत्र्य अनुभवणारी स्त्री खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पाईक व्हावी या उद्देशाने अंगणगाव येथील शिक्षक कॉलनीत घरांना मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आल्याने उपक्र मशील शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.महालखेडा येथील प्राथामिक शाळेतील या शिक्षकांनी शाळेतील तसेच गावातील मुलींच्या नावाच्या पाट्या त्यांच्या घराच्या दरवाजाला लावून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा अनमोल संदेश दिला. हाच आदर्श समोर ठेवून येथील शिक्षक ज्ञानेश्वर पायमोडे, ज्ञानेश्वर बारगळ, सुरेश ठोंबरे यांनी कॉलनीतील सर्व पन्नास मुलींच्या घराच्या दरवाजाला त्यांच्या नावाच्या पाट्या लावून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हे अभियान राबविले. या उपक्रमाने कॉलनीतील सर्व पालक आपल्या लाडलीचे होत असणारे कौतुक पाहून आनंदीत झाले. माता पालकांचे डोळे भरून आलेले पाहायला मिळाले .नुकताच मुलीला जन्म दिलेली माता योगिता कुणाल जगताप यांचा या प्रसंगी सुरेश ठोंबरे, ज्ञानेश्वर पायमोडे, ज्ञानेश्वर बारगळ या शिक्षकांनी सत्कार करून स्त्री जन्माचे स्वागत केले. याप्रसंगी राजेंद्र जगताप, दिलीप धिवर, गोरक्षनाथ थोरात, सुदाम कटारे, विजयसिंह चव्हाण, भागवत जगताप, संतोष कुमावत, दत्ता दवंगे, अजय जाधव यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानदानाचे काम करता करता शिक्षकांनी सामाजिक जाणिवेतून ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ हा संदेश लेकीच्या नावाची पाटी दरवाजाला लाऊन समाजापर्यंत पोहोचवला हे कार्य गौरवास्पद आहे.-विठ्ठल आठशेरे, सरपंच अंगणगाव ता. येवला