मुंबई : मुलुंडमध्ये एका तरुणीचा शुक्रवारी सायंकाळी भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार होत असताना रस्त्यावरून ये-जा करणा-यांपैकी कोणीही तिच्या मदतीला आले नाही. अखेर त्या नराधमापासून स्वत:ची सुटका करून घेत पीडित तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.अरविंद गोरी (५८) असे आरोपीचे नाव आहे. गोरी हा भांडुप येथे राहणारा आहे. त्याचा त्याच्या भावासोबत मालमत्तेवरून वाद सुरू आहे. तसेच गोरीच्या पुतण्याचे मुलुंड पश्चिमेकडे इस्टेट एजंटचे कार्यालय आहे. शुक्रवारी गोरी या कार्यालयावर धडकला, तेव्हा तेथे त्याचा पुतण्या नव्हता. मात्र तेथे काम करीत असलेल्या ३२ वर्षीय तरुणीला त्याने येथे काम करू नकोस, असे धमकावले. येथे काम केलेस तर तुझ्यावर बलात्कार करेन, असा दमही गोरीने तरुणीला दिला. तेव्हा त्या तरुणीने तेथून पळ काढला. गोरीने मागे जात भररस्त्यात एका ठिकाणी त्या तरुणीला गाठले. तेथे त्याने तिचा हात पकडून अतिप्रसंग केला. (प्रतिनिधी)
भररस्त्यात तरुणीचा विनयभंग
By admin | Updated: February 9, 2015 05:50 IST