शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालातही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

By admin | Updated: June 13, 2017 15:09 IST

राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 13 - राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल  ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. राज्याच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नापास झालेल्या विद्यार्थींची फेरपरीक्षा 18 जुलैला घेण्यात येणार आहे. 

१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत.  कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत.  90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले. 
 
राज्य मंडळाने एकूण ५६ विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्यातील २१ हजार ६८४ शाळांमधून १६ लाख ५० हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
 
- पिंपरी चिंचवडमध्ये दहावीचा निकाल ९३.३७
 
पिंपरी चिंचवडचा दहावीचा निकाल ९३.३७ टक्के इतका आहे. बारावीनंतर दहावीच्या परिक्षेतही मुलींचा टक्का अधिक आहे. 
पिंपरी चिंचवडमधील १७४ शाळांमधुन १८ हजार ७३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते.त्यापैकी १६ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९४.७२ टक्के मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. तर मुलांची टक्केवारी ९२.२२ इतकी आहे. 
शहराच्या विविध भागातील खासगी संस्था तसंच महापालिकेच्या शाळांमधून ९७९४ मुले आणि ८ हजार २६२ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. एकुण १८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ३२ विद्यार्थी आणि ७८२६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत
 
 
 
 
निकालाची विभागनिहाय आकडेवारी  
 
विभाग         टक्के  
 
पुणे           ९१.९५             
 
नागपूर      ८३.६७                
 
औरंगाबाद   ८८.१५        
 
मुंबई            ९०.०९      
 
कोल्हापूर      ९३.५९          
 
अमरावती     ८४.३५      
 
नाशिक         ८७.७६      
 
लातूर             ८५.२२   
 
कोकण          ९६.१८
 
एकूण।        ८८.७४       
 
येथे पहा निकाल..