शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकून तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: March 24, 2015 02:27 IST

पुढल्या आठवड्यात निकाह असल्याने मेहंदीची आॅर्डर देण्यास घराबाहेर पडलेल्या २३ वर्षीय तरुणीचा लिफ्टमध्ये चिरडून मृत्यू झाला.

मुंबई : पुढल्या आठवड्यात निकाह असल्याने मेहंदीची आॅर्डर देण्यास घराबाहेर पडलेल्या २३ वर्षीय तरुणीचा लिफ्टमध्ये चिरडून मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री मालाड पूर्वेकडील पठाणवाडीतल्या अल-मुजाल्फा इमारतीत घडला. अपघातात मृत्यू झालेली आलिया आरिफ वराडीया आपल्या पठाणवाडीतल्या हुमेरा इमारतीत राहत होती. लग्न तोंडावर आल्याने मेहंदीची आॅर्डर देण्यास काल रात्री ती आईसोबत घराबाहेर पडली. शेजारील इमारतीतल्या चौथ्या मजल्यावरील एका घरात मेहंदीची आॅर्डर देऊन परतत असताना तिने लिफ्ट थांबवली. लिफ्ट आॅटोमॅटिक असल्याने दार उघडताच मागाहून येणाऱ्या आईला आत घेता यावे यासाठी आलिया दरवाजात मधोमध उभी राहिली. आईची वाट पाहात असतानाच लिफ्टचे दार अचानक बंद झाले. दोन्ही बाजूंनी बंद होणाऱ्या दरवाजात आलिया मधोमध अडकली. तशाच अवस्थेत लिफ्टने तळमजला गाठला. यात आलिया चार माळे फरफटत खाली गेली. कुटुंबीय व इमारतीतल्या रहिवाशांनी आलियाला दरवाजातून कसेबसे बाहेर काढले. जवळच्या हयात रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारांपूर्वीच आलियाला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयचंद्र काथे यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आलियाचे वडील आरिफ यांचे गोरेगावच्या एका मॉलमध्ये मोबाइलचे दुकान आहे, तर तिची आई गृहिणी असून त्यांना आलिया व्यतिरिक्त दोन मुले आणि मुली आहेत. पुढच्याच आठवड्यात आलियाचे लग्न होते. संपूर्ण कुटुंब उत्साहात लग्नाची तयारी करत होते. घरी लग्नाची लगबग सुरू होती, अशातच आलियाचा मृत्यू झाला आणि क्षणात हे कुटुंब शोककळेत बुडाले.तिला वाचवू शकलो नाही !आलिया अडकली तेव्हा लिफ्टमध्ये अल-मुजाल्फा इमारतीत राहणाऱ्या दोन व्यक्ती हजर होत्या. ‘आम्ही तिला लिफ्टमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती पूर्णपणे अडकली होती. त्यामुळे तिला वेदनेने ओरडताना पाहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता,’ असे त्यांनी पोलिसांना सांगितले.