शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

औरंगाबाद विभागातही मुलीच अव्वल

By admin | Updated: May 30, 2017 18:02 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 30 -  माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी जाहीर केला. यंदाही निकालात मुलांना मागे टाकत मुलींनीच बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ८९.८३ टक्के असून यामध्ये मुलींचा निकाल ९२.७५ टक्के, तर मुलांचा निकाल ८८.११ टक्के लागला आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६४ टक्क्यांनी अधिक आहे. 
विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शिशीर घनमोडे यांनी दुपारी हा निकाल जाहीर केला. यावेळी विभागीय सचिव वंदना वाहुळ, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते. घनमोडे यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागात नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८९.८३  इतकी असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी निकालात मुलींची आघाडी कायम आहे. विभागीय शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला असला तरी विद्यार्थ्यांना येत्या ९ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मुळ गुणपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे. यंदा कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांनी सुरुवातीला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे काही दिवस पेपर तपासणीचे संथगतीने झाले. त्यानंतर मात्र, तपासणीचे काम सुरळीत झाले. त्यामुळे निकालाला थोडा वेळ लागल्याचे मंडळाचे अध्यक्ष घनमोडे यांनी सांगितले. यावर्षी बारावीची पुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेतली जाणार आहे. 
फेब्रुवारी- मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागात १ लाख ६२ हजार ६६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये नियमित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५७ हजार ४४६, तर पुनर्परीक्षार्थी ४ हजार ६२० होते. यापैकी १ लाख ४३ हजार ४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ४१ हजार ४३२ नियमित परीक्षार्थी, तर २ हजार १९ पुनर्परीक्षार्थींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत ६८ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेत १२ हजार १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण हे ९१.५७ टक्के एवढे आहे. कला शाखेत ५६ हजार ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.६१ एवढे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. व्होकेशनलचे ४ हजार ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
 
विभागात परभणीची आघाडी
औरंगाबाद विभागात बारावीच्या निकालामध्ये परभणी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ८९.७६ टक्के असून ५३ हजार ५३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बीड जिल्ह्यात ३३ हजार ६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९०.४९ इतकी आहे. परभणी जिल्ह्यात १९ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या जिल्ह्याचा निकाल ९०.५९ टक्के लागला आहे. जालना जिल्ह्यात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.४९ टक्के एवढे निकालाचे प्रमाण आहे. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ८९.८३ टक्के एवढा असून या जिल्ह्यात ११ हजार १९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.